तुमच कर्ज कोणी परत करत नसेल व त्याने तुमच्या दबावाने त्याने जीवन संपवलं तर काय होईल ? तुम्हाला शिक्षा होऊ शकते का? वाचा

असं म्हटलं जातं की, कुणाचा वाईट काळ कधी सुरू होईल हे सांगता येत नाही. कधी माणूस अडचणीत येतो तर कधी आर्थिक नुकसान होते. त्यामुळे त्याला कर्ज घ्यावे लागते. मात्र, अजूनही अनेक चांगले लोक आहेत जे एखाद्याची लाचारी पाहून पैसे उधार देतात. परंतु अनेकवेळा कर्जदार पैसे परत करण्यास नकार देतात. अशा वेळी तुम्ही त्याच्यावर पैसे परत मिळवण्यासाठी दबाव टाकला आणि त्याने किंवा त्याच्या पत्नीने जीवन संपवलं तर? छत्तीसगड उच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने कर्जाची परतफेड करण्याची मागणी केली तर त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले असे संबोधले जाणार नाही.

तुमच्या दबावामुळे त्याने जीवन संपवलं तर काय होईल?
जर एखाद्या व्यक्तीने कर्जाची परतफेड करण्याची मागणी केली तर तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असे मानले जाणार नाही. कारण कोणत्याही पैसे देणारा व्यक्ती ते मागे घेणारच. असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुख्य न्यायमूर्ती रमेश सिन्हा यांच्या खंडपीठाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली दाखल एफआयआर आणि आरोपपत्र फेटाळताना हे निरीक्षण नोंदवले.

उच्च न्यायालयाने महिलेवरील एफआयआर आणि आरोपपत्र रद्द केले
छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी नरेश यादव यांनी तेथे राहणाऱ्या शैला सिंह यांना पंतप्रधान विकास कौशल्य योजनेशी संबंधित सरकारी योजनेची माहिती दिली. शैला सिंह यांनी नरेश यादव यांना सुमारे 10 लाख रुपये दिले, परंतु यादव यांनी याचिकाकर्त्यांच्या हिस्सा दिला नाही.
शैला सिंह यांनी त्यांना अनेकदा पैसे परत करण्याची विनंती केली, त्यानंतर नरेश यादव ने तिचा फोन उचलणे आणि तिच्या मेसेजला उत्तर देणे बंद केले. शैला सिंह यांनी यादव यांना परिणाम भोगण्याची धमकी दिल्यानंतर त्यांच्या पत्नीने जीवन संपवल. त्यानंतर शैला सिंह यांच्याविरोधात भादंवि कलम ३०६ अन्वये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते आणि त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने महिलेवरील एफआयआर आणि आरोपपत्र रद्द केले.