सामाजिक कार्यकर्ते अविनाश साठे सरांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार प्रदान

डॉ. मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट व निती आयोग भारत सरकार दिल्ली संलग्नित यांच्या वतिने. यंदाचा मानाचा समजला जाणारा ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार – 2023 “हा. पुरस्कार भोयरे पठार गावचे सुपूत्र मा. श्री. अविनाश बाबासाहेब साठे यांना मिळाला.

त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील व शैक्षणिक शकेत्रातील उत्तुंग कामगिरी बद्दल डॉ. रविंद्र भोळे यांच्या हस्ते लोकशाहिर आण्णाभाऊ साठे रंगमंच भवन पुणे. या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

या वेळी डॉ.रविंद्र भोळे आपल्या भाषणात बोलताना श्री. अविनाश साठे सर यांच्या सामाजिक कार्यबद्दल तोंड भरून कौतूक केले व म्हणाले आजच्या आधुनिक युगात हा तरुण निस्वार्थ भावनेने आपले सामाजिक कार्य करत आहे. यापुढेही त्यांनी आपले काम असेच चालू ठेवावे असे उद्गार काढले.

पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. अविनाश साठे सरांचे सर्वत्र कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.