अजित पवारांच्या बाबतीत मराठा समाजाने घेतला मोठा निर्णय !

मागील काही दिवसांपासून मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. या आंदोलनाचा फटका सर्वच राजकीय नेत्यांना बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाहि याचा फटका बसला. दरम्यान ते डेंग्यूने आजारी पडले. त्यावर मराठा समाजाने टीका देखील केली. परंतु आता त्यांचा आजार जास्तच बळावला आहे. त्यामुळे आता मराठा समाजाने अजित पवारांविरोधातील आंदोलन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यात अजित पवार यांच्या हस्ते आज गळीत हंगामाचे उद्घाटन होणार होते. या कार्यक्रमाला दौंड शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजाने विरोध केला होता. मात्र, अजित पवार यांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे आता आंदोलन रद्द करण्याचा निर्णय घेण्य़ात आला आहे. अजित पवारांऐवजी सुनेत्रा पवार हंगाम सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा ६७ वा हंगाम सुरू करण्याचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते आयोजित केला होता. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप यांना निवेदन देण्यात आले. यंदाचा हंगाम कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या हस्ते घेऊ नये. राजकीय व्यक्तींच्या हस्ते गळीत हंगाम सुरू करण्याचा कार्यक्रम केल्यास कारखान्यावर बहुसंख्येने येऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला होता. परंतू, तिथेही अजित पवार गेले नव्हते.

अजित पवार यांची तब्येत खालावली
अजित पवार यांची तब्येत मंगळवारी खालावली. अजित पवारांवर उपचार करणारे डॉ. संजय कपोटे म्हणाले होते की, वेळ पडल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल. अजित पवार यांना गेल्या चार-पाच दिवसांपासून डेंग्यूची लागण झाली आहे. एनएस 1 पॉझिटिव्ह असल्याने त्यांना अजूनही 101 डिग्री आहेत. गरम आहे. अजित पवारांच्या प्लेटलेट रेट दिवसेंदिवस कमी होत आहे. शरीरातील पांढऱ्या पेशीही कमी झाल्या आहेत. अजित पवार यांच्या वैद्यकीय तपासणीत काही विशेष आढळल्यास त्यांना रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.