सामाजिक कार्यकर्ते अविनाश साठे(सर) युवा मंचकडून किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण

निलेश लंके प्रतिष्ठान महा .राज्य. व अविनाश साठे सर मित्र परिवार आयोजित किल्ले बनवा स्पर्धा-२०२३ या स्पर्धेचे हे दुसरे पर्व आहे . या स्पर्धेतून मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचे कौशल्य वृंधिगत व्हावे, आपल्या सणासुदींचे महत्व, भारतीय संस्कृतीची महती मिळावी , आपल्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्याविषयीचे अफाट ज्ञान व महाराजांचा इतिहास यातून मुलांना मिळावा म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. आयोजक श्री. अविनाश साठे सर हे सामाजिक,शैक्षणिक, व क्रीडा क्षेत्रात नेहमी अग्रेसर असतात . या सामाजिक कार्यातून त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार ,महाराष्ट्र भूषण पुरस्कार, स्वराज्यभूषण पुरस्कार, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.या स्पर्धचा बक्षीस वितरण कार्यक्रम नगर-पारनेर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री.निलेशजी लंके साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी आमदार साहेबांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना सायकल व शैक्षणिक वस्तुंचे वाटप करण्यात आले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक- चि.शिवराज रावसाहेब देवकर,द्वितीय क्रमांक- कु. रागिनी गोरख उमाप, तृतीय क्रमांक- ध्रुव मुठे व रुद्र मुठे यांना सामूहिक, चतुर्थ क्रमांक – सोहंम सुखदेव मुठे, पाचवा क्रमांक- स्वराजराजे जमदाडे, सहावा क्रमांक – कु. अभिलाशा साठे, सातवा क्रमांक- प्रताप खंडागळे यांनी पटकावला कार्यक्रम प्रसंगी आमदार निलेशजी लंके साहेब यांनी आयोजक श्री. अविनाश साठे सर यांच्या कार्याचे कौतुक केले .व विजेत्या स्पर्धकांना पुढील वर्षी यापेक्षाही अधिक छान गडकिल्ले बनवण्याविषयीं मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी भोयरे पठार व भोयरे खुर्द गावचे सरपंच,उपसरपंचं, ग्रा.प. सदस्य, वि.का.से.सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन , सदस्य,त्याचप्रमाणे आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष , पदाधिकारी, पालक व मित्र परिवार मोठ्या संख्यने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नानासाहेब डोंगरे यांनी केले. व आभार श्री.अमोल बोठे यांनी मानले.