‘सबका मालिक एक’.. पंतप्रधान मोदींना उद्देशून शिर्डीच्या सभेत अजित पवारांनी केल ‘ते’ वक्तव्य अन चर्चांना उधाण

शिर्डीमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. यावेळी ७ हजार ५०० कोटींच्या कामांचे लोकार्पण व उदघाटन यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी झालेल्या त्यांच्या सभेत सुरवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. परंतु त्यांचे काही वक्तव्य आश्चर्यकारक होते.

ज्या पक्षांसोबत ते मागील अनेक वर्षे सत्तेत होते त्यांच्यावरच त्यांनी अनेक अपयशाची खापर फोडली. राष्ट्रवादीमध्ये बंड करून अजित पवार भाजपसोबत आले. ते पुन्हा माघारी परततील अशी अपेक्षाही अनेक लोक व्यक्त करत आहेत. परंतु कालच्या सभेत ज्यांच्याशी राजकीय शत्रुत्व आहे त्यांच्या स्टेजवर ते ज्यांच्यासोबत सत्तेत होते त्यांच्यावर टीका करताना दिसले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निळवंडेवरुन काँग्रेसवर टीका
अजित दादांनी यावेळी निळवंडे वरून टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, मागील ५३ वर्षांत अनेकवेळा निळवंडे धरणाच्या कामाचा नारळ फोडण्याचे काम अनेक राज्यकर्त्यांनी केले. निवडणुका आल्या की नारळ फोडायचा व कामाचे आश्वासन द्यायचे परंतु बघता बघता तीन पिढ्या गेल्या पण काम झाले नाही अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस सरकारवर टीकास्त्र सोडले. हे काम झाल्यामुळे आता १८२ गावांना या धरणाचे पाणी मिळणार आहे. हे धरण पूर्णत्वास नेण्याचे काम हे बहुतेक नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हायचं होतं त्यामुळे मधला एवढा काळ गेला असावा असेही पवार यावेळी म्हणाले.

‘सबका मालिक एक’
आपण आज शिर्डीमधील पावन भूमीत आहोत. महाराष्ट्र ही भक्ती व शक्तीची भूमी असल्याचे पवार यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी साईबाबांच्या मंत्राचा एक दाखला दिला. साईबाबांनी सबका मालिक एक असा मंत्र सर्वांना दिला. याचा अर्थ असा की तो एकच ईश्वर आहे व तोच सर्व जगाचे कल्याण करत आहे.
नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ‘सबका साथ सबका विकास’ची घोषणा केली होती. त्या घोषणेची प्रेरणा साईबाबांचा ‘सबका मलिक एक’ हा मंत्र असावा. त्यांची गेल्या साडेनऊ ते दहा वर्षांची कारकीर्द पाहिली तर ते या घोषणेच्या माध्यमातून देशाला पुढे नेत आहेत, असे आपल्याला पावलोपावली वाटते असे पवार म्हणाले.

चर्चांना उधाण
अजित पवार हे पुन्हा घरवापसी करतील. राष्ट्रवादी पुन्हा एक संघ होईल असे वाटत होत. परंतु आता तशी स्थिती राहिली नाही असा अर्थ अनेकांनी या वक्तव्यातून काढलेला आहे. बहुतेक देश पातळीवर नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व अजित दादांनी मेनी केले आहे का ? अशीही चर्चा सध्या रंगली आहे.