Nokia 105 Classic : Nokia ने 999 रुपयांचा फोन केला लॉन्च ! UPI पेमेंटचेही ऑप्शन, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Nokia 105 Classic : एक काळ होता कि जेव्हा फक्त नोकिया कंपनीच्याच फोनचे राज्य होते. एकदम टिकाऊ अन परवडेबल फोन म्हणजे नोकिया होता. आता नोकिया चे ते जुने दिवस पुन्हा एकदा आपण अनुभवू शकतो. कारण आता नोकिया ने नवीन फिचर फोन लॉन्च केला आहे.

HMD Global ने या वर्षाच्या सुरुवातीला Nokia 105 4G फोन लाँच केला होता. आता कंपनीने Nokia 105 क्लासिक नावाचे आणखी एक मॉडेल लाँच केले आहे. हा सर्वात स्वस्त फीचर फोन आहे जो बिल्ट-इन यूपीआय सिस्टमसह येतो, जो 2 जी कनेक्टिव्हिटी प्रदान करतो. जाणून घेऊयात Nokia 105 Classic चे किंमत आणि फीचर्स…

Nokia 105 Classic चे फीचर्स
Nokia 105 Classic मध्ये इनबिल्ट यूपीआय अॅप्लिकेशन आहे. याद्वारे तुम्ही सुरक्षित आणि सोयीस्कर व्यवहार प्रक्रिया करू शकता. याशिवाय युजर्संना एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटीही दिली जाते. डिव्हाइस वायरलेस रेडिओ क्षमतेसह येते जे आपल्याला हेडसेटशिवाय एफएम रेडिओ ऐकण्याची सुविधा प्रदान करते. फोनमध्ये 800mAh बॅटरी आहे. यूजरला विविध सुविधा देण्याच्या विचाराने नोकिया 105 क्लासिकमध्ये कॉम्पॅक्ट डिझाइन आहे, ज्यामुळे हँडसेट सांभाळणे किंवा एका ठिकाणावरून दुसरीकडे नेणे सोपे होते. शिवाय पर्यावरणविषयक जागरुकता लक्षात घेऊन त्याच्या टिकाऊ व मजबूतपणाची देखील काळजी घेण्यात आली आहे.

Nokia 105 Classic Price In India
Nokia 105 Classic हा भारतात अधिकृतरित्या उपलब्ध आहे. फोन चार्जरसह किंवा त्याशिवाय चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये येतो. तसेच त्यात सिंगल सिम आणि ड्युअल सिम दोन्ही पर्याय आहेत. याची किंमत 999 रुपयांपासून सुरू होते. हा फोन चारकोल आणि ब्लू या दोन आकर्षक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.