शिर्डीतील मोदींची सभा म्हणजे मंत्री राधाकृष्ण विखे यांची मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग आहे का ?

Narendra Modi In Shirdi: उद्या दिनांक २६ ऑक्टोबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सभा होत आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishn Vikhe Patil) यांनी या सभेसाठी कंबर कसून प्रयत्न चालवले आहेत. शिर्डीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यातील महत्वाची बाब म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी गर्दी जमवण्यासाठी खा. सुजय विखे (Sujay Vikhe Patil) व मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे.

१ लाखांपेक्षा जास्त लोक या सभेला नेण्याचा चंगच जणू पिता पुत्रांनी बांधला आहे. सरकारी कार्यालयांपासून तर स्वतःची खासगी यंत्रणापर्यंत त्यांनी कामाला लावली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अनेकांनी यावर टीका केली, विरोधकांचे तर समजू शकतो पण स्वपक्षीयांमधून देखील अनेकांनी नाराजीचा सूर आळवला. पण झुकतील ते विखे कसले? या सर्व अडचणींवर मात करत, विरोधकांना शांत करत उद्याचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे. आता प्रश्न पडतो की विखे यांनी ज्या पद्धतीने व जसे प्लॅनिंग चालवले आहे त्यामागे काही विशेष कारण आहे का ? कारण सभा दिल्लीश्वरांची आहे. सध्या ज्यांच्या शब्दावर भाजप सुरु आहे त्यांची आहे त्यामुळे या सभेमागने काहीतरी मोठं कारण दडलंय अशी चर्चा नागरिकांत आहे. या सभेचे नियोजन म्हणजे मंत्री राधाकृष्ण विखे यांची ही मुख्यमंत्री पदासाठी लॉबिंग आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात व नागरिकांत सुरु आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे राजकीय वजन व मुख्यमंत्री पदाची लालसा
विखे यांचे राजकीय वलय व राजकारणावरील पकड सर्वश्रुत आहे. अहमदनगर जिल्हा मग तो दक्षिण मतदार संघ असो किंवा शिर्डी असो विखेंच शाब्द व त्यांचे राजकीय वजन सर्वाना माहिती आहे. ते काँग्रेसमध्ये होते तेव्हाही आणि आता भाजपात आहेत तेव्हाही. तसेच त्यांची मुख्यमंत्री पदासाठी असणारी इच्छा ही देखील लपून राहिलेली नाही. मध्यंतरी जेव्हा सत्तानाट्य झाले (शिंदे गट बंड) तेव्हा देखील थेट दिल्लीत मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी लॉबिंग केलं होत अशी चर्चा रंगली होती.

दिल्लीतील वजन
भाजपमध्ये मंत्री विखे यांचे थेट दिल्लीत देखील वजन आहे. कारण जिथे मोदी शहा याना भेटायला अनेकांना वेळ काढावा लागतो व वारंवार जाऊनही भेट होत नाही तेथे राधाकृष्ण विखे डायरेक्ट जाऊन भेटतात. विशेष म्हणजे शिर्डीत गृहमंत्री अमित शहा दोन वेळेस व पंतप्रधान मोदी अताउड्या सभेसाठी येतायेत. ही गोष्ट खूप मोठी आहे. त्यामुळे त्यांचे दिल्लीत मोठे वजन असल्याचे कळते.

देवेंद्र फडणीस केंद्रात जाण्याची चर्चा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या भाजपचे मुख्यमंत्री पदाचे चेहरा आहेत. कारण त्यांच्या इतके स्ट्रॉंग नेतृत्व तरी सध्या तरुणांना दुसरे दिसत नाही. परंतु सध्या भाजपचे लोकसभेसाठी मिशन ४५ आखलेला आहे. त्यामुळे फडणवीस याना खासदारकी लढवावी लागूही शकते व ते दिल्लीत जाऊ शकतात असे म्हटले जात आहे. जर ते केंद्रात गेले तर महाराष्ट्रासाठी भाजकडे पर्याय हवा. यासाठी तर मग आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील लॉबिंग करत असावेत अशी चर्चा आहे.

मराठा कार्ड ?
सध्या मराठा आरक्षण मुद्दा चांगलाच तापला आहे. वेळ पडली तर त्याचा फटका इलेक्शनमध्ये बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जर भाजपच्या डोक्यात मराठा कार्ड चालवण्याची खेळी आली तर भाजपकडे राधाकृष्ण विखे यांखेरीज दुसरा तगडा माणूस नाही. त्यामुळे विखे यांची लॉटरी लागू शकते असेही म्हटले जात आहे.

सभेमध्ये वर्चस्व दाखवण्याची संधी
उद्याच्या सभेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश अधिकारी वर्ग असेल. सोबतच दक्षिण व उत्तरेतील सर्वच मह्तवपूर्ण नेते, आमदार, मार्केट कमिटी पासून तर सोसायटीपर्यंत सर्वच श्रेष्ठी असतील. विशेष म्हणजे दक्षिण व उत्तरेतील नेत्यांचा मेळघालण्यात त्यांना बऱ्यापैकी यश आले आहे. त्यामुळे हे सर्व एकाच मांडवाखाली एकत्रित आले म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात किती मोठं वर्चस्व आहे हे त्यांना यातून दाखवता येईल.

मंत्री राधाकृष्ण विखे खरच मुख्यमंत्री होतील ?
हे सर्व सायास करून मंत्री राधाकृष्ण विखे खरच मुख्यमंत्री होतील का अशी चर्चा सामन्यांत सुरु आहे. कारण त्यांना स्वपक्षातून देखील विरोध होऊ शकतो असे म्हटले जात आहे. परंतु तेथेही विखे काही पर्याय काढतील असे वाटते. त्यामुळे आता मंत्री राधाकृष्ण विखे मुख्यमंत्री होतील कि नाही हे येत्या काळातच पाहावं लागेल.