महाराष्ट्रातील राजकीय वातवरण चांगलेच तापू लागले आहे. आगामी लोकसभेच्या हिशोबाने सर्वच पक्ष तयारी करत आहेत. भाजपने तर अनेक रणनीती आखल्या आहेत. यात अजित पवार यांचे बंड व त्यांना भाजपसोबाबत सत्तेत आणणें हे याचाच एक भाग म्हणावे लागेल.
महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी शरद पवार नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवार हेच खरे नेते आहे असे चित्र रंगविले. परंतु असे असले तरी, जनमानसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचीच ताकद आहे हे मात्र केंद्राला आता कळले असावे. कारण शिर्डीतील भाषणात इतर नेहमीच्या कोणत्याही मुद्द्यांना मोदी यांची हात घातला नाही. परंतु शरद पवार यांची दखल घ्यावी लागली.
मोदींनी शरद पवारांवर का टीका केली असावी?
शिर्डीतील सभेत मोदी यांनी महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने दहा वर्षे केंद्रात कृषिमंत्रिपद भूषविले, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असा सवाल केला. त्यांनी नाव घेतले नसले तरी हा रोख राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे होता हे सर्वाना माहिती आहे. मोदी यांनी शरद पवार यांना आपल्या भाषणात टार्गेट केले होते. त्यांचे अस्तित्वच राहिलेले नसेल तर मग मोदी यांना त्यांच्यावर आरोप करण्याची किंवा त्यांना टार्गेट करण्याची काय गरज होती ? असा सवाल सभेस आलेले लोक करत होते.
देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांसह भाजपनेते अजित पवार हेच राष्ट्रवादीचे नेते असल्याचे चित्र रंगवत आहेत. राष्ट्रवादीचा किंवा जनमानसाचा अजित पवारांना पाठिंबा असल्याचा दावा भाजपने केला आहे. पण मोदींनी राज्य दौऱ्यात शरद पवारांवर निशाणा साधला. अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतरही शरद पवार यांनी जनतेत छाप कायम आहे. त्यांची जनमानसात ताकद कायम असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे अहवाल आले असावेत आणि त्यामुळेच त्यांनी पवार यांची दखल घेतली नसती अशीही चर्चा आहे.
आरक्षण किंवा इतर मुद्द्यांची चर्चा नाही
विविध पक्षांकडून जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात आहे, त्यावर त्यांनी भाष्य केलं नाही. तसेच राज्यात मराठा आरक्षण हा विषय तापलेला आहे, त्यावरही त्यांनी काही भाष्य केले नाही.