पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिर्डीतील सभा उत्तमरीत्या पार पडली. यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी लावलेले नियोजन किती तगडे होते हे सर्वाना माहीतच आहे. त्यांच्या नियोजनाचे हे फलितच म्हणावे लागेल. दरम्यान त्यांनी या वेळी पंतप्रधान मोदींना काही भेटवस्तू दिल्या. यामध्ये एक तलवार देखील होती. सोबतच त्यांनी साईबाबांची मूर्ती, श्रीराम व सीतेची मूर्ती, मंगलकलश दिला. यासोबतच त्यांनी मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत जिल्हाभरातील गावांची माती ठेवलेला आणखी एक मंगल कलश देखील दिला.
खास आहे तलवार
पंतप्रधान मोदींना मंत्री विखेंनी जी तलवार दिली ती देखील खास होती. भगवान विष्णूंचे दहा अवतार चितारलेली ही तलवार होती. सध्या देशात राम मंदिराचा विषय चर्चेत आहे. लवकरच त्याचा उदघाटन सोहळा देखील होईल. नरेंद्र मोदी हे कट्टर हिंदुत्व मानतात हे सर्वश्रुत आहे. त्यांचे देशप्रेम व सोबतच हिंदुत्व प्रेम हे सर्वाना माहित आहे. यामुळेच बहुतेक त्यांना आवडेल किंवा साजेशी होईल अशी भगवान विष्णूंचे दहा अवतार त्यावर रेखाटलेली तलवार त्यांना भेट दिली असावी असा कयास उपस्थितांनी बांधला त्यात वावगे नाही.
हिंदुत्व कार्ड
मंत्री विखे हे काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर ते भाजपात आले. परंतु कालच्या सभेत हिंदुत्व कार्ड वर फुंकर मारल्याचे पाहायला मिळाले. कारण मोदी यांना आवडणाऱ्या श्रीराम व सीता मातेची मूर्ती देणं असो किंवा विष्णूंचे दहा अवतार चितारलेली तलवार असो. तसेच या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराचा वारंवार केलेला उल्लेख असो, यामुळे सभा पाहणाऱ्यांना नागरिकांना कुठेतररी याचा फील आला अशी चर्चा देखील रंगली होती.
विखे घराण्याची पॉवर
विखे पाटील हे काँग्रेसमध्ये होते, शिवसेनेतूनही जाऊन आले, आता भाजपमध्ये आहेत. परंतु अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची मोठी पकड आहे. ते कुठल्याही पक्षात असले तरी त्याचा फारसा परिणाम होत नाही कारण त्यांचे वैयक्तिक संबंध व राजकारणावरील पकड एकदम घट्ट आहे. त्यांची पॉवर आजतागायत टिकून आहे.