शिवसेनेचे नगरसेवक ज्ञानेश्वर येवले, संग्राम कोतकर, शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह 40 जणांविरूध्द गुन्हा दखल करण्यात आला आहे. रस्त्याच्या कामासाठी नगर-पुणे महामार्गावर केडगाव बस स्टॉप येथे त्यांनी आंदोलने केले होते. याच प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नेमके काय घडले होते ?
नगर-पुणे महामार्गावरील अंबिकानगर बसस्थानकासमोर नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, संग्राम कोतकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी मंगळवारी निदर्शने केली. प्रभाग क्रमांक 16 मधील रस्त्याचे काम सुरू करावे अशी त्यांची मागणी होती. नगर-पुणे महामार्ग रोखून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणाकोणावर गुन्हा दाखल ?
नगरसेवक ज्ञानेश्वर शिवाजी येवले, शिंदे गटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, संग्राम संजय कोतकर, नगरसेवक विजय पठारे, डॉ. श्रीकांत चेमटे, हर्षवर्धन कोतकर, प्रतिक बारसे, विठ्ठल कोतकर, संदेश शिंदे, पप्पू भाले आदींसह 40 लोकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.