बातमीपत्र24 /टीम : गेल्या दोन दिवसांपूर्वी खासदार निलेश लंके यांनी निमगाव येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात नगर तालुक्यातील अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांच्यावर सडकून टीका केली होती. त्या टिकेमुळे पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात संदेश कार्ले यांच्याच नावाची जोरात सुरु झाली आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई लंके यांना अपक्ष उमेदवार संदेश कार्ले हेच तूल्यबळ लढत देवू शकतात असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात असल्यामुळे खा. लंके यांनी कार्ले यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यामुळे लंके-कार्ले-दाते यांच्यातील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून काशिनाथ दाते उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून राणी लंके उमेदवार आहेत. माजी आमदार विजय औटी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले व माजी नगराध्यक्ष विजय औटी हे मातब्बर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
त्यात लंके-दाते-कार्ले यांच्यातील होणारी टाईट फाईट चर्चेत येवू लागली आहे. नगर तालुक्यातील एक लाखापेक्षा जास्त मतदान पारनेर मतदारसंघात आहे. येथे संदेश कार्ले मोठे मताधिक्य घेतली. तसेच ऐन वेळी पारनेरमधून मातब्बरांची साथ कार्ले यांना मिळू शकते असा अंदाज बांधला जातोय.
या अनुषंगानेच खासदार निलेश लंके यांनी कार्ले यांच्यावर सडकून टीका केली. संदेश कार्ले यांच्या शिवसेनेच्या निष्ठावंतपणावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच मी ठरवले तर नगर तालुक्यातही बूथ लावू देणार, ग्रामपंचायत सदस्यही होवू देणार नसल्याचाही इशारा दिला.
त्यामुळे नगर व पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये तीव्र रोष दिसून येत असल्याची चर्चा आहे. खा. लंके यांच्या विधानावर संदेश कार्ले काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पारनेर तालुक्यात संदेश कार्ले यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात नगर तालुक्यातील एक लाखापेक्षा जास्त मतदान आहे. येथे संदेश कार्ले मोठे मताधिक्य घेतील. तसेच पारनेर तालुक्यात कार्ले यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
नगर तालुक्यातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला त्याच पद्धतीने पारनेरमधील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविणार, पठार भागात वाटाणा प्रक्रिया उद्योग, थेट व्यापारी शेतात ही संकल्पना, कान्हूर पठार 16 गावे पाणी योजना कार्यान्वित करणार,
शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणारे चिचोंडी पाटील मॉडेल राबविणार असल्याचे अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांनी प्रचारादरम्यान सांगितले. संदेश कार्ले निष्ठावंत शिवसैनिक, साधेपणा मतदारांना भावत असल्याने पारनेरमधूनही कार्लेंच्या प्रचाराला प्रतिसाद मिळत आहे.