अहमदनगर : श्री सद्गुरू माध्य. व उच्च माध्य. विद्यालय मेहेकरी विद्यालयाने 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली. इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागला. इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा निकालही 100 टक्के लागला असून कला शाखेचा निकाल 97 टक्के लागला.
यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे – बारावी विज्ञान शाखेत प्रथम-सूर्यवंशी प्रांजल 80.50%, द्वितीय- दळवी अस्मिता 77.83%, तृतीय- शिंदे ऋतुजा 77.17% तर बारावी कला शाखेत प्रथम – शिंदे मोनिका 82.17%, द्वितीय – वाकचौरे श्रावणी 79.50%, तृतीय – वाकचौरे अर्चना 78.67% तसेच इयत्ता दहावी मध्ये प्रथम – कुमटकर साक्षी 92.80%, द्वितीय-पंडित सायली 88.80%, तृतीय – शिंदे राधिका 88.20%
यशस्वी विद्यार्थ्यांचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रा.ह.दरे, उपाध्यक्ष डॉ.विवेक भापकर, सचिव ऍड.विश्वासराव आठरे, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार ऍड.दीप लक्ष्मी म्हसे ज्येष्ठ विश्वस्त जे.डी खानदेशे, विश्वस्थ नंदकुमार झावरे, विश्वस्त मुकेश मुळे व इतर विश्वस्त, सदस्य, शाळा समितीचे सदस्य शिवाजीराव पालवे, दक्षता समितीचे अध्यक्ष संतोष करपे, सरपंच नंदू पालवे, विद्यालयाचे प्राचार्य गोबरे व्ही एच, ज्युनिअर कॉलेजचे समन्वयक चौधरी आर.बी. ग्रामस्थ व सर्व सेवक वृंद आदींनी अभिनंदन केले.