माजी झेडपी सदस्य संदेश कार्ले अन पंचायत समिती सभापती रामदास भोर यांचा मोठा निर्णय ! शिवसेनेला रामराम करत नव्या पक्षात प्रवेश

विजय गोबरे : आज अहिल्यानगरमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी होणार आहेत. आज खऱ्या अर्थाने नगरमध्ये ठाकरेंची सेना ही पोरकी होणार आशा चर्चा सध्या सुरू आहेत. नगर तालुक्यात खऱ्या अर्थाने शिवसेना ज्यांनी वाढवली, रुजवली अन याच पक्षमार्फत जिल्हा परिषदेत दोनदा तर पंचायत समितीला एकदा विजय मिळवला असे सेनेचे खंदे मावळे संदेश कार्ले हे आज शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

त्यांच्यासोबत रामदास भोर हे देखील शिंदेंसेनेत जातायत. आगामी निवडणुका तसेच सत्तास्थान आदी गोष्टी पाहता अन विकासकामे आदी गोष्टी सोयीला लागव्यात याकरता शिंदे गटात हे जातायत अस म्हटलं जातंय.
खरतर विधानसभेला पारनेर आणि नगर या दोन्ही ठिकाणी ठाकरेंच्या सेनेला तिकीट दिल गेलं नाही, तेथेच कार्ले नाराज झाले होते. विधानसभेला ही नाराजगी दिसूनही आली. त्यानंतर ते शिंदे गटाची चाचपणी करत होते.

आज ते खऱ्या अर्थाने शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होतील. आता यानंतर या सर्वांचे म्होरके , नेते, मार्गदर्शक गाडे सर काय भूमिका समोर मांडतायेत तेही पाहणे गरजेचे आहे. पण या प्रवेशाने नगर तालुक्यातील खा.लंके, आ.कर्डीले, ना. विखे यांच्याही राजकारणावर परिणाम होणार हे नक्की. मित्रांनो खरतर या पक्षप्रवेशाला अनेक राजकीय किनार आहेत.. त्याचाही उलगडा लवकरच आम्ही करणार आहोत.

विजय गोबरे
विजय गोबरे
Senior Digital Content Producer बातमीपत्र24 ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ब्रेकिंग, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. मागील दहा वर्षांपासून विविध वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून कामकाजचा अनुभव

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles