Batamipatra24 https://batamipatra24.com निस्वार्थ बातम्या देणारे संकेतस्थळ Fri, 15 Nov 2024 14:32:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://batamipatra24.com/wp-content/uploads/2023/10/maha.png Batamipatra24 https://batamipatra24.com 32 32 महाऑनलाईन व आधार सेवा असोसिएशनच्या तालुका उपाध्यक्षपदी कोठुळे https://batamipatra24.com/kothule-as-taluka-vice-president-of-mahaonline-and-aadhaar-seva-association/ Fri, 15 Nov 2024 14:32:56 +0000 https://batamipatra24.com/?p=614 अखिल महाऑनलाईन व आधार सेवा असोसिएशनच्या नगर तालुका अध्यक्षपदी संदीप पुंड, उपाध्यक्षपदी राजेंद्र कोठुळे, सचिवपदी करीम बेग, कार्याध्यक्षपदी मनोहर काळे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सर्वांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

अखिल महाऑनलाईन व आधार सेवा असोसिएशनची नुकतीच बैठक पार पडली. याबैठकीमध्ये नगर तालुक्यातील कार्यकारिणीच्या निवडी करण्यात आल्या. कार्यकारिणीत नगर तालुका अध्यक्षपदासाठी संदीप गुंड यांचे नाव सुचविण्यात आले.

तर उपाध्यक्ष पदासाठी राजेंद्र अशोक कोठुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. तर सचिवपदी करीम बेग, कार्याध्यक्षपदी मनोहर काळे यांच्या निवडी करण्यात आल्या.

अखिल स्तरीय महार्आनलाईन व आधार सेवा असोसिएशनच्या नगर तालुका कार्यकारिणीमध्ये निवड झालेल्या सर्वांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. दरम्यान, वरिष्ठांनी संघटनेत काम करण्याची संधी दिली आहे.

त्यांच्या विश्वासाला तडा जावू न देता नगर तालुक्यातील महाऑनलाईन केंद्र (सेतू केंद्र) संचालकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोठुळे यांनी सांगितले.

]]>
614
नगर तालुक्यात नागवडे आणि पाचपुते यांच्यामध्येच रस्सीखेच, कौल कुणाला ? https://batamipatra24.com/nagar-taluka-between-nagwade-and-pachpute-kaul-who/ Wed, 13 Nov 2024 14:59:12 +0000 https://batamipatra24.com/?p=611 बातमीपत्र24/ टीम : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत होत असून मतदारसंघातील उमेदवाराचे भवितव्य व निर्णायक मतदान नगर तालुक्यातील मतदारांवरच अवलंबून आहे. नगर तालुक्यात भाजपा युतीचे उमेदवार विक्रमसिंह पाचपुते व महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांच्यामध्ये मोठी रस्सीखेच पाहावयास मिळत आहे.

श्रीगोंदा मतदार संघात नगर तालुक्यातील वाळकी, चिचोंडी पाटील गट जोडला असल्याने येथील मतदारांचा कौल हा श्रीगोंद्याचे आमदार ठरविण्यात नेहमीच निर्णायक ठरत आला आहे. तालुक्यात भाजपा व उबाठा शिवसेना यांची मोठी ताकद व कार्यकर्ते आहेत. त्यामुळे येथे पाचपुते व नागवडे यांच्यामध्ये मोठी रस्सीखेच चालू असल्याचे पहावयास मिळत आहे.

तालुक्यातील मतदार पाचपुतेंना कौल देणार की नागवडेंना याबाबत विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. गावोगावी महाविकास आघाडी तसेच महायुतीचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झाले असून दोन्हीकडूनही आपल्या उमेदवाराला मताधिक्य देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

नागवडे तसेच पाचपुते समर्थकांकडून विजयाचा दावा करण्यात येत असला तरी तालुक्यातील मतदार कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून तालुक्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून नागवडे अन् पाचपुते यांच्यामध्ये मोठी चुरस पहावयास मिळत आहे.

श्रीगोंदा मतदारसंघाला जोडल्या गेलेल्या दोन्ही गटांमध्ये भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचे प्राबल्य आहे. त्यांचे कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांना मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. गावोगावी नागवडे तसेच पाचपुते यांच्या गाव भेटी,

प्रचार दौरे, चौक सभा पार पडत असून दोन्ही समर्थकांकडून विजयाचा दावा करण्यात येत आहे. एकंदरीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचे भवितव्य हे नगर तालुक्यातील मतदारांवरच अवलंबून असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील मतदारांनी दिलेला कौल हा निवडणुकीत निर्णायक ठरत असतो.

]]>
611
खा. निलेंश लंकेंच्या विधानाने चौकाचौकात संदेश कार्लेंच्याच नावाची चर्चा https://batamipatra24.com/sandesh-karles-name-is-discussed-at-the-intersection-with-nilensh-lankas-statement/ Sun, 10 Nov 2024 11:54:51 +0000 https://batamipatra24.com/?p=606 बातमीपत्र24 /टीम : गेल्या दोन दिवसांपूर्वी खासदार निलेश लंके यांनी निमगाव येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात नगर तालुक्यातील अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांच्यावर सडकून टीका केली होती. त्या टिकेमुळे पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात संदेश कार्ले यांच्याच नावाची जोरात सुरु झाली आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई लंके यांना अपक्ष उमेदवार संदेश कार्ले हेच तूल्यबळ लढत देवू शकतात असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात असल्यामुळे खा. लंके यांनी कार्ले यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यामुळे लंके-कार्ले-दाते यांच्यातील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून काशिनाथ दाते उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून राणी लंके उमेदवार आहेत. माजी आमदार विजय औटी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले व माजी नगराध्यक्ष विजय औटी हे मातब्बर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

त्यात लंके-दाते-कार्ले यांच्यातील होणारी टाईट फाईट चर्चेत येवू लागली आहे. नगर तालुक्यातील एक लाखापेक्षा जास्त मतदान पारनेर मतदारसंघात आहे. येथे संदेश कार्ले मोठे मताधिक्य घेतली. तसेच ऐन वेळी पारनेरमधून मातब्बरांची साथ कार्ले यांना मिळू शकते असा अंदाज बांधला जातोय.

या अनुषंगानेच खासदार निलेश लंके यांनी कार्ले यांच्यावर सडकून टीका केली. संदेश कार्ले यांच्या शिवसेनेच्या निष्ठावंतपणावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच मी ठरवले तर नगर तालुक्यातही बूथ लावू देणार, ग्रामपंचायत सदस्यही होवू देणार नसल्याचाही इशारा दिला.

त्यामुळे नगर व पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये तीव्र रोष दिसून येत असल्याची चर्चा आहे. खा. लंके यांच्या विधानावर संदेश कार्ले काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पारनेर तालुक्यात संदेश कार्ले यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात नगर तालुक्यातील एक लाखापेक्षा जास्त मतदान आहे. येथे संदेश कार्ले मोठे मताधिक्य घेतील. तसेच पारनेर तालुक्यात कार्ले यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

नगर तालुक्यातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला त्याच पद्धतीने पारनेरमधील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविणार, पठार भागात वाटाणा प्रक्रिया उद्योग, थेट व्यापारी शेतात ही संकल्पना, कान्हूर पठार 16 गावे पाणी योजना कार्यान्वित करणार,

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणारे चिचोंडी पाटील मॉडेल राबविणार असल्याचे अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांनी प्रचारादरम्यान सांगितले. संदेश कार्ले निष्ठावंत शिवसैनिक, साधेपणा मतदारांना भावत असल्याने पारनेरमधूनही कार्लेंच्या प्रचाराला प्रतिसाद मिळत आहे.

]]>
606
काशिनाथ दाते यांचा प्रचाराचा नारळ फुटला, मतदारांना मोठं भावनिक आवाहन https://batamipatra24.com/kashinath-dates-campaign-coconut-burst-a-big-emotional-appeal-to-the-voters/ Wed, 06 Nov 2024 15:28:13 +0000 https://batamipatra24.com/?p=602 बातमीपत्र२४/टीम : आजपर्यंत मी स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारातील छोटया मोठया १९-२० निवडणूका लढविल्या. काही निवडणूकांमध्ये विजय झाला, काहींमध्ये पराभवही झाला. मात्र मी थकलो नाही, थांबलो नाही. लोकांसाठी काम सुरूच ठेवले. माझ्या आयुष्याचा शेवट या निवडणूकीने होणार असल्याचे सांगत या निवडणुकीत आपल्या पाठीशी उभे राहण्याचे भावनिक आवाहन महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांनी केले.

दाते यांच्या प्रचाराचा प्रारंभ दैठणे गुंजाळ येथील खंडोबा मंदिरात जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. त्यानंतर झालेल्या सभेमध्ये दाते यांनी आपल्या भावना मांडल्या.

दाते म्हणाले, गेली ४० वर्षे काम केल्याने लोकांमध्ये माझ्याविषयी सहानुभुती आहे. मी माझ्या आयुष्यात माझ्यासाठी कमी व दुसऱ्यांसाठी जास्त काम केलेले आहे. स्व.वसंतराव झावरे, विजयराव औटी यांच्या निवडणूकीचे मी स्वतः नियोजन केले. आज मात्र मी उमेदवार असल्याने नियोजनाची जबाबदारी माझ्या सहकाऱ्यांनी स्विकारावी असे आवाहन त्यांनी केले.

दाते पुढे म्हणाले, भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारासाठी आघाडीवर असून त्याचा मला अभिमान आहे. ही निवडणूक माझ्या आयुष्यातील शेवटची निवडणूक आहे. ४० वर्षे राजकारण करताना स्व यशवंतराव चव्हाण यांचा विचार घेउन मी काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा मी कार्यकर्ता असल्याचे दाते यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी युवतीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, सुजित झावरे, अशोक सावंत, विश्वनाथ कोरडे, प्रशांत गायकवाड, वसंत चेडे, अश्विनी थोरात, सुषमा रावडे, सुनील थोरात, शाम पिंपळे, दादाभाऊ चितळकर, दवेंद्र गावडे, अरूण होळकर, दिलीप भालसिंग, भाऊ भोर, सुभाष दुधाडे, बाबासाहेब खिलारी, राहुल शिंदे, बाळासाहेब लामखडे, विक्रमसिंह कळमकर,

गणेश शेळके, डॉ. भाऊसाहेब खिलारी, अशोक चेडे, रामचंद्र मांडगे, शिवाजी खिलारी, किसन धुमाळ, लहू भालेकर, एकनाथ धुरपते, एकनाथ सोनवणे, बापूसाहेब गुंजाळ, ॲड. युवराज पाटील, दिनेश बाबर, संतोष गायकवाड, छबू कांडेकर, दत्ता पवार, दादाभाऊ वारे आदी उपास्थित होते.

… म्हणून सुजित झावरे तातडीने नगरकडे
ज्यांनी प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडला ते सुजित झावरे हे सभेतून निघून गेले. त्यांच्या आई सुप्रियाताई तथा माई यांना हृदयाचा त्रास झाल्याने त्यांना रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी ते तातडीने नगरकडे रवाना झाले असून त्याचा वेगळा अर्थ लावण्यात येऊ नये.
काशिनाथ दाते
महायुतीचे उमेदवार

विकासाच्या मुद्यावर निवडणूक
पाच वर्षापूव खोटी नाटी अश्वासने देण्यात आली. त्यावर मी बोलणार नाही. मला विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक न्यायची आहे. वसंतराव झावरे, विजय औटी यांच्या काळात विकास झाला. पाच वर्षात काय झाले ? एमआयडीसीचा उपयोग सर्वसामान्यांसाठी झाला पाहिजे, भुमिपुत्राला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी माझी ही निवडणूक असल्याचे दाते म्हणाले.

रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी बांधील
तालुक्यातील रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी मी बांधील असून तसा जाहिरनामा आम्ही प्रसिध्द केला आहे. जिथे काम केले तिथे प्रामाणिक काम केले. बाजार समितीला राज्यात नावलौकीक आहे ते काम माझ्याच नेतृत्वाखाली झाले.

जिल्हा परिषदेमध्ये सभापती म्हणून काम करताना मी केवळ जिल्हा परिषदेच्या टाकळी गटात नाही तर संपूर्ण तालुक्यात काम केले. काम करताना पक्ष, गट तट पाहिले नाहीत गावागावात विकास कामे केली असल्याचे दाते यांनी सांगितले.

दाते सर म्हणून माझी ओळख
काशिनाथ दाते व्यक्ती नगर तालुक्यात माहीती नसली दाते सर म्हणून नगर तालुक्यात माझी ओळख आहे. मी प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होत आलो आहे. मात्र माझी एकच चुक झाली की मी सोबत कॅमेरा घेऊन गेलो नसल्याची मिश्किलीही दाते यांनी केली.

कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही
गावागावात चाललेली भांडणे, ग्रामपंचायत, सोसायटयांमधील वाद थांबवायचे असतील तर तुम्ही मला सहकार्य करा. हे सगळे आपण थांबवू. ज्यावेळी माझ्यावर अन्याय झाला त्याला मी प्रतिकार केला आहे.

इकडचा तिकडे गेलो नाही. मला संधी दिली तर या तालुक्यात नाहीशी झालेली शांतता पुन्हा प्रस्थापित करू. सुरु असलेला गोंधळ थांबवू. कोणत्याही कार्यकर्ता वाऱ्यावर सोडला जाणार नाही सर्वांना बरोबर घेऊन काम केले जाईल अशी ग्वाही दाते यांनी यावेळी दिली.

अजितदादांचे आश्वासन पूर्ण करू
अजित पवार यांच्या उपस्थितीत कान्हूरपठार येथे पाणी परिषद झाली होती. पवार यांनी पारनेर तालुक्याचे हक्काचे पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. ही योजना मोटारीचे बील कोण भरणार या मुद्यावर रखडली.

आता प्रगत तंत्रज्ञान आले आहे. सोलरवर १०० अश्वशक्तीचे पंप चालतात. त्याचा वापर करून पठार भागावर पाणी आणण्यात येउन अजित पवार यांनी दिलेले आश्वासन पुर्ण केले जाईल असे आश्वासन दाते यांनी यावेळी दिले.

१६ गाव योजनेसाठी मुळातून पाणी
१६ गाव पाणी योजना अनेक वर्षे टंचाईमध्ये ही योजना सुरू होते. मांडओहळचा पाणी साठा संपल्यानंतर ही योजना बंद होते. मुळा डॅममधून या योजनेसाठी पाणी आणण्याच्या योजनेला चालना देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे दाते म्हणाले.

घाटमाथ्यावरील पाण्याची योजना माग लावू
बाळासाहेब विखे यांच्या संकल्पनेतील सहयाद्रीच्या घाटमाथ्यावर पडणारे पश्चिमेकडे वाहून जाणारे पावसाचे पाणी पूर्वेकडे सोडण्याची योजना आहे. ही योजना केंद्राकडे पोहचविण्यात आली असून आम्हाला ताकद दिली तर ही योजनाही मार्गी लावू.
– काशिनाथ दाते
महायुतीचे उमेदवार

घराघरांत प्रचार पोहचवा
अफवांवर विश्वास ठेऊ नका. कामाला लागा. प्रचाराची साधने पुरविली जातील. घराघरापर्यंत प्रचार पोहचला पाहिजे. लोकसभा निवडणूकीत आम्ही घराघरापर्यंत पोहचण्यात कमी पडलो ही चुक सुधारायची असल्याचे दाते म्हणाले.

दाते नव्हे, अजितदादा उमेदवार
व्यासपीठावरील दिग्गज पाहीले तर दाते यांचा विजय निश्चित आहे. विरोधक अपप्रचार करतील. कार्यकर्त्यांनी सतर्क राहीले पाहिजे. दाते सर हे उमेदवार नसून स्वतः अजितदादा उमेदवार आहेत. अजित पवार यांचा शब्द ठाम असतो हे महाराष्ट्राला माहीती आहे. संन्याशाचे सोंग घेऊन कोणी वागणार असेल तर पारनेरकर त्यांना माफ करणार नाहीत.
– संध्या सोनवणे
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी युवती काँग्रेस

अजितदादा त्यांचे पुनर्वसन करणार
तालुक्यात गैरसमजाची राळ उडविली जात आहे. निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पारनेरची जागा राष्ट्रवादीकडे राहिली. पुढे वसंतराव झावरे यांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करणारे काशिनाथ दाते यांनी पक्षासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुजित झावरे, माधवराव लामखडे, विजय औटी हे देखील पक्षासोबत आले.

सर्वेक्षणात ज्याला पसंती मिळेल त्यास उमेदवारी देण्याची ग्वाही अजित पवार यांनी दिला होती. त्यानुसार दाते यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. उर्वरीत इच्छुकांचे पुनर्वसन करण्याची ग्वाही दादांनी दिली आहे. दादांसमोर कोणालाही बळजबरीने नेण्यात आलेले नाही.
– अशोक सावंत
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

स्व. वसंतराव झावरे यांचा आदर्श घेउन दाते यांची वाटचाल सुरू असून त्यांचे काम पाहून त्यांना अजित पवार यांनी संधी दिली आहे. पारनेर-नगरच्या परिवर्तनाची ही निवडणूक असून चांगल्या नेतत्वाला संधी म्हणून काशिनाथ दाते यांना संधी द्या.
– विक्रमसिंह कळमकर
तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

संधीचे सोने करा
समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊ शकत जाणारे व्यक्तिमत्व अशी काशिनाथ दाते यांची ओळख आहे. आमदार म्हणून काम करण्याची संधी आपण त्यांना दिली पाहिजे. या संधीचे सोने केले पाहिजे. महायुतीने समाजातील सर्व घटकांना न्याय दिला असून राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आणण्यासाठी काशिनाथ दाते यांनी मतदान करावे.
– संदीप ठुबे
शिवसेना पदाधिकारी

तर लाडकी बहिण योजना बंद होईल !
प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गावामध्ये महायुती सरकारच्या योजना समजावून सांगितल्या पाहिजेत. लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. मात्र दाते सरांना मतदान केले नाही तर योजना बंद होईल. केंद्रात महायुतीचे सरकार असून राज्यातही त्याच विचारांचे सरकार येणार आहे.
– अरुण होळकर
मा. जि. प. सदस्य

सुजित झावरे, डॉ. श्रीकांत पठारे यांनी मोठेपणा दाखविला
बुध्दीवाद्यांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या तालुक्यात गेल्या काही वर्षात वेगळे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. या निवडणूकीत सुसंस्कत, बुध्दीवादी उमेदवार लाभला असून सर्वांना बरोबर घेउन जाणारे हे नेतत्व आहे.

सुजित झावरे, डॉ. श्रीकांत पठारे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून उमेदवारी मागे घेतली असून त्यांनी मनाचा मोठेपणा दाखविल्याबद्दल मी त्यांचे आभार माणतो. टाकळी ढोकेश्वर गटातून दाते यांना सर्वाधिक मतदान देणार आहोत.
– डॉ. भाऊसाहेब खिलारी

दीड महिन्यांपासून भाजपा कार्यकर्ते सक्रिय
उमेदवारी जाहिर होण्यास विलंब झाला. दाते यांच्या उमेदवारीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. त्यांना तालुक्याचे प्रश्न माहीती आहेत. राजकारण करताना समाजाकरण डोळयापुढे ठेऊन त्यांनी काम केले. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच भाजपाचे कार्यकर्ते दिड महिन्यांपासून प्रचारात उतरले आहेत.

बुथ कमिटयांच्या बैठका घेण्यात येऊन महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. तालुक्याच्या विकासासाठी महायुतीचा उमेदवार विजयी करावा लागेल. विरोधी उमेदवारांना ३ लाख ४६ हजार मतदारांमध्ये एकही लायक उमेदवार सापडला नाही का ? एकाच घरात दोन पदे कशासाठी ?
राहुल शिंदे
तालुकाध्यक्ष, भाजपा

तुम्ही आरक्षण का दिले नाही ?
पाच वर्षात मराठा व धनगर आरक्षणाचे मुद्ये गाजले. विरोधांकडून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येते. मात्र गेली सत्तर वर्षात तुम्ही सत्तेत असताना आरक्षण का दिले नाही. आरक्षणाचा मुद्या पुढे करून निवडणूकीत मते वळविण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणूकीत हा मुद्दा आणणे योग्य नाही. आरक्षण हा घटनेच्या चौकटीतील अवघड विषय आहे.
– दादाभाऊ चितळकर
मा. अध्यक्ष, जिल्हा दूध संघ

दाते यांना मोठया पदावर बसविण्यासाठी शिफारस करू
महाराष्ट्राची निवडणूक देशासाठी महत्वाची आहे. या निवडणूकीकडे जगभरातील जनतेचे लक्ष असून महायुती कशी जिंकते याकडे लक्ष आहे.महायुती सरकार स्थापन केले तर केंद्रातील सरकारही मजबूत होईल. त्यानंतर देशाचा जगात डंका वाजेल. केंद्रात नरेंद्र मोदी आल्यानंतर जगात भारताची इज्जत वाढली आहे.

लोकांनी गरीबीवर तीन तीन निवडणूका जिंकल्या. मोदींनी मात्र विविध योजनांद्वारे २२ लाख करोड रूपये खर्च करून गरीबांसाठी काम केले. दाते यांना विजयी केले तर महाराष्ट्रात महायुती येईल. महिला, शेतकरी, युवक यांचे कल्याण होईल. भारताला विश्वगुरूच्या स्थानावर बसविण्यासाठी महायुतीला विजयी करा. प्रत्येक बुथवर काम केले तर आपण लंका दहन केल्याशिवाय राहणार नाही. तम्ही हनुमान आहात मी जांबुवंतच्या भूमिकेत उभा आहे. तुम्ही लंका दहन करणार आहात. दाते यांना विजयी केले तर त्यांना मोठया पदावर बसविण्यासाठी मी केंद्राकडे शिफारस करणार आहे.
– खा.अनिलकुमार जैन
महामंत्री भाजपा

]]>
602
विरोधकांत नैराश्य, पायाखालची वाळू सरकू लागली ; काशिनाथ दातेंच मोठं वक्तव्य https://batamipatra24.com/disappointment-in-the-opposition-the-sand-began-to-slip-under-the-feet-big-statement-by-kashinath/ Thu, 31 Oct 2024 09:08:13 +0000 https://batamipatra24.com/?p=599 बातमीपत्र 24 / टीम : 
पारनेर मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परंतु त्यांच्या उमेदवारीबाबत पारनेर तालुक्यात सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती.

एका टिव्ही चॅनलवर अशी बातमी दाखवली जात होती की, पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार काशिनाथ दाते यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्या ऐवजी विजय सदाशिव औटी यांची उमेदवारी जाहीर केली जाणार आहे.

परंतु सदर बातमी ही फेक आहे अशी माहिती हायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार काशिनाथ दाते यांनी मीडियाशी बोलतांना दिली.

दाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी एका टिव्ही चॅनलवर अशी बातमी दाखवली जात होती की, पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार काशिनाथ दाते यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्या ऐवजी विजय सदाशिव औटी यांची उमेदवारी जाहीर केली जाणार आहे.

अशी ही बातमी मोठ्या प्रमाणात सर्वत्र फिरवली जात होती. सदर बातमी सगळीकडे झाल्यामुळे महायुतीतील कार्यकर्ते संभ्रमावस्थेमध्ये होते. मात्र यानंतर स्वतः उमेदवार काशिनाथ दाते यांनी एक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकल्यानंतर सदर चॅनलची बातमी फेक असल्याचे समोर आले.

पक्षाचा ए बी फॉर्म माझ्याकडेच : दाते
पारनेर-नगर मतदारसंघातील महायुतीच्या सर्व अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक व इतर पक्षातील सहकारी मित्रांना सुचित करण्यात येते की, महायुतीच्या अधिकृत उमेदवाराची प्रचारात दिसून येत असलेली आघाडी, जनतेचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता या मतदारसंघात परिवर्तन हे अटळ असल्याची विरोधकांची खात्री झाली आहे.

त्यातून येत असणाऱ्या नैराश्यातून महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. चुकीच्या पद्धतीने एडिटिंग करून दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. त्याबाबत कोणीही चिंता करू नये. आपल्या उमेदवारी नामनिर्देशन पत्रासोबतच पक्षाचा ए.बी. फॉर्म जमा केलेला आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट या राष्ट्रीय पक्षाचे आपणच अधिकृत उमेदवार आहोत. याबाबत कोणीही मनामध्ये शंका आणू नये असं आवाहन काशिनाथ दाते यांनी केले आहे.

]]>
599
मेहेकरी विद्यालयास कै. विलासराव आठरे पाटील ट्रस्ट तर्फे आदर्श विद्यालय पुरस्कार https://batamipatra24.com/mehekari-vidyalaya-ka-adarsh-vidyalaya-award-by-vilasrao-athare-patil-trust/ Wed, 16 Oct 2024 08:37:05 +0000 https://batamipatra24.com/?p=594 स्व. प्राचार्य विलासरावजी आठरे व स्व. जनाताई आठरे यांचे स्मरणार्थ आदर्श विद्यालय पुरस्कार दरवर्षी दिला जातो. हा पुरस्कार जिल्हा मराठा संस्थेतील सर्व शाखांमधून प्रथम क्रमांकास दिला जातो. यंदाच्या वर्षी अ.नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री सद्गुरु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मेहेकरी या विद्यालयाला हा पुरस्कार संस्थेच्या दसरा मेळाव्यात देण्यात आला.

ट्रॉफी व तीस हजार रुपये असे या बक्षिसाचे स्वरूप आहे. तसेच शासनाचा स्वच्छ व सुंदरशाळा पुरस्कारही विद्यालयाला मिळालेला आहे. या विद्यालयाने संस्था, लोकसहभाग, लोकप्रतिनिधी, खाजगी कंपन्या, क्रीडा कार्यालय यामधून पैसा उभा करून लाखो रुपयांची कामे पूर्ण केलेली आहेत.

तसेच या आधीच अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेने एक कोटीची इमारत बांधून दिलेली आहे. विद्यालयामध्ये तालीम, बाग,विविध खेळाचे मैदाने , कारंजे, इंडोअर गेम हॉल, सभागृह,प्रत्येक वर्ग डिजिटल, सिमेंट रस्ता, पेविंग ब्लॉक अशी अनेक कामे पूर्ण झाले असल्याची व केलेल्या कामाबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शाळेचे कौतुक केले असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य गोबरे व्ही.एच यांनी दिली.

]]>
594
मेहेकरी विद्यालय आदर्श, स्वच्छ व सुंदर विद्यालय : आ.बबनराव पाचपुते https://batamipatra24.com/mehekari-vidyalaya-ideal-clean-and-beautiful-school-a-babanrao-pachpute/ Sun, 13 Oct 2024 15:41:55 +0000 https://batamipatra24.com/?p=586 अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री सद्गुरु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मेहेकरी ही जिल्ह्यातील एक आदर्श स्वच्छ व सुंदर शाळा आहे.

शासनाचा  स्वच्छ व सुंदरशाळा पुरस्कारही विद्यालयाला मिळालेला आहे. या विद्यालयाने लोकसहभाग, लोकप्रतिनिधी, खाजगी कंपन्या यामधून निधी उभा करत लाखो रुपयांची कामे पूर्ण केली, हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांनी काढले.

आ. बबनराव पाचपुते यांनी विद्यालयाला सिमेंटचा रस्ता व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पेविंग ब्लॉक साठी निधी दिला. ते काम पूर्ण झाल्यानंतर पाचपुते  यांनी शाळेत येऊन पाहणी केली.  यावेळी ते बोलत होते.

ते पुढे बोलताना म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची व बहुजन समाजाची मुले येथे शिक्षण घेत असल्याचा मला आनंद होत आहे असेही ते म्हणाले.

प्राचार्य विकास गोबरे यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेने एक कोटीची इमारत बांधून दिलेली आहे. आज विद्यालयामध्ये तालीम,बाग,विविध खेळाचे मैदाने , कारंजे, इंडोअर गेम हॉल, सभागृह,  डिजिटल वर्ग अशी अनेक कामे पूर्ण झालेली आहेत.

यावेळी मेहेकरी गावचे सरपंच नंदूशेठ पालवे, महेश लांडगे,  करपे तात्या आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चौधरी आर बी  यांनी केले. आभार पर्यवेक्षक श्री. श्रीकांत कातोरे यांनी मानले.

]]>
586
कडक चेहऱ्यामागचं कोमल मन ..! विखे साहेबांचे ‘ते’ फोटो पाहून काळजात चर्रर्र झालं.. मिसळ,जिलेबी अन कार्यकर्ते.. https://batamipatra24.com/a-soft-heart-behind-a-hard-face-after-seeing-those-photos-of-vikhe-saheb-i-was-shocked-misal-jalebi-and-activists/ Tue, 13 Aug 2024 03:44:20 +0000 https://batamipatra24.com/?p=573 Ahmednagar Politics : सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्रच राजकीय दिग्गजांची धावपळ सुरु आहे.

निवडणुका कोणत्याही असो यामध्ये आघाडीवर असणार नाव म्हणजे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

मग ते नाव नेहमीच आघाडीवर असत. विरोधकांच्या टीकेच्या जहरी बाणांत असो वा स्वतःच्या पक्षाच्या विजयी वाटचालीत असो.

या सगळ्या गराड्यात सुसंस्कृत राजकारण कस करावं हे फक्त विखे परिवाराकडूनच शिकावं. विखे पाटलांवर पातळी सोडून टीका केली तरी विरोधक निश्चिन्त असतात ,कारण त्यांनाही हे माहीत असत की विखे पाटील हे सुसंस्कृत राजकारणी आहेत. ते आपण केलेली टीका खिलाडू वृत्तीने घेतील.

पण विखे पाटील यांनी केवळ कामेच करावीत का? ते देखील एक माणूस आहेत. त्यांनाही भावना आहेत.

त्यांचा साधेपणा, व्यक्त होण्याची पद्धत अन एका कडक चेहऱ्यामागे लपलेलं कोमल मन… हे सगळे विचार समोर येण्याचं कारण म्हणजे त्यांचे साधेपणाचे व्हायरल झालेले फोटो.

ते म्हणजे एका हॉटेलात येवून स्वतः विखे पाटलांनी नागरिकांसमवेत मिसळीवर ताव मारल्याचे फोटो.

नेमके काय झाले?
आपले कार्यकर्ते एका हॉटेलवर थांबलेले आहेत हे समजताच नविन नगर मार्गावरील एका हॉटेलात येवून स्वतः विखे पाटलांनी मिसळीवर ताव मारला.

कार्यकर्त्यांशी संवाद साधला. निळवंडे येथे जलपूजन आणि पाणी सोडण्याच्या कार्यक्रमाला जाताना संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ते याच हॉटेल मध्ये एकत्रितपणे मिसळ खाण्यासाठी थांबले असल्याचे मंत्री विखे पाटील यांना समजले.

कार्यकर्त्यानी त्यांना मिसळ खाण्यासाठी येण्याचा आग्रह केला. मंत्री विखे पाटील आपला वाहनांचा संपूर्ण ताफा त्यांनी या हाॅटेलकडे वळवला आणि कार्यकर्त्या समवेत त्यांनी मिसळ खाण्याचा आनंद घेत त्यांनी तालुक्यातील राजकारणा बाबत काही टिप्सही दिल्या.

संगमनेरची प्रसिध्द असलेली जोशींची जिलेबी त्यांनी आवर्जून मागून घेतली. जोशीच्या जिलेबी स्व.बाळासाहेब विखे पाटील यांची आवड होती आशी आठवण करून दिली.

असा नेते होणे मुश्किल
ऐषोरामात कुठेही पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना जेवता आले असते पण कुठेतरी ते देखील माणूस आहेत.

आपलेच सहकारी मिसळीवर ताव मारतायत तर आपणही त्यातील एक आहोत हीच भावना जणू त्यांच्या मनात आली व त्यातून त्यांनी आपले पद, इतर तामझाम सगळ बाजूला ठेवून नागरिकांत धाव घेतली.

अगदी मनापासून ताव मारला. आपल्या वडिलांच्या आठवणीने ते भावुकही झाले. राजकारणात वावरताना स्वभाव कडक ठेवावा लागतो.

पण वेळेला अगदी आपल्या जनतेप्रमाणे साधही व्हावं लागत. जमिनीवरच राहून सर्वाना सोबत घ्यावं लागत हाच संदेश जणू त्यांनी दिला. पुरोगामी महाराष्ट्रात असा नेते होणे मुश्किल असेच काहीसे उदगार नागरिकांच्या चर्चेतून समोर येत होते.

]]>
573
मेहेकरी विद्यालयाचा 100 टक्के निकाल https://batamipatra24.com/mehekari-vidyalaya-result-100-percent/ Thu, 30 May 2024 05:23:45 +0000 https://batamipatra24.com/?p=566 अहमदनगर : श्री सद्गुरू माध्य. व उच्च माध्य. विद्यालय मेहेकरी विद्यालयाने 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली. इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागला. इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा निकालही 100 टक्के लागला असून कला शाखेचा निकाल 97 टक्के लागला.

यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे – बारावी विज्ञान शाखेत प्रथम-सूर्यवंशी प्रांजल 80.50%, द्वितीय- दळवी अस्मिता 77.83%, तृतीय- शिंदे ऋतुजा 77.17% तर बारावी कला शाखेत प्रथम – शिंदे मोनिका 82.17%, द्वितीय – वाकचौरे श्रावणी 79.50%, तृतीय – वाकचौरे अर्चना 78.67% तसेच इयत्ता दहावी मध्ये प्रथम – कुमटकर साक्षी 92.80%, द्वितीय-पंडित सायली 88.80%, तृतीय – शिंदे राधिका 88.20%

यशस्वी विद्यार्थ्यांचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रा.ह.दरे, उपाध्यक्ष डॉ.विवेक भापकर, सचिव ऍड.विश्वासराव आठरे, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार ऍड.दीप लक्ष्मी म्हसे ज्येष्ठ विश्वस्त जे.डी खानदेशे, विश्वस्थ नंदकुमार झावरे, विश्वस्त मुकेश मुळे व इतर विश्वस्त, सदस्य, शाळा समितीचे सदस्य शिवाजीराव पालवे, दक्षता समितीचे अध्यक्ष संतोष करपे, सरपंच नंदू पालवे, विद्यालयाचे प्राचार्य गोबरे व्ही एच, ज्युनिअर कॉलेजचे समन्वयक चौधरी आर.बी. ग्रामस्थ व सर्व सेवक वृंद आदींनी अभिनंदन केले.

]]>
566
जामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे लोरी चित्रपटास संगीत दिग्दर्शन https://batamipatra24.com/jamkhed-writer-director-altaf-shaikh-composed-the-music-for-the-film-lori/ Mon, 06 May 2024 08:47:54 +0000 https://batamipatra24.com/?p=561 जामखेड / तालुका प्रतिनिधी : चित्रपट दिग्दर्शक अल्ताफ शेख हे लेखन, दिग्दर्शन, गीतकार या पाठोपाठ आता बॉलिवूड चित्रपटात संगीत दिग्दर्शक रूपाने प्रेक्षकांसमोर येत आहेत. अल्ताफ शेख यांनी आगामी हिंदी चित्रपट ‘लोरी’चे गीत लेखन केले असून, सुधीर कुमार हजेरी यांच्यासोबत संगीत दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. प्रसिध्द गायक सुरेश वाडकर, गायिका उर्मिला धनगर, गायक स्वप्निल बांदोडकर, गायिका प्रियांका बर्वे आणि गायिका अंजली गायकवाड यांनी या चित्रपटाची गाणी गायली आहेत.

दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘वेडा बी.एफ.’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला. ११ करोड ५० लाख ४५ हजार सातशे रुपये एवढा गल्ला करून रेकॉर्ड ब्रेक करून टाकले. सिनेमातील ‘हे माझे दुर्वेश बाबा’ या गाण्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन ‘लोरी’ या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली. ती त्यांनी सुधीर कुमार हजेरी यांच्यासोबत यशस्वीपणे पार पाडली आहे.

अल्ताफ शेख यांनी त्यांच्या अनोख्या लेखन शैलीतून याआधी चार चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यापैकी २०१८ मध्ये रिलीज झालेल्या वेडा बी.एफ या हिंदू – मुस्लीम ऐक्यावर भाष्य करणार्‍या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला केला होता. वेडा बी.एफ चित्रपटाची नोंद वल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेले आहेत.

दरम्यान, साई राम अ क्रिएटिव्ह वर्ल्डचप्र स्तुती असलेल्या लोरी चित्रपटाचे निर्मिती अविनाश कवठणकर यांची असून, दिग्दर्शन राजू रेवणकर यांचे आहे. डीओपी कुमार डोंगरे, पणती पटेल, राजकुमार, अली शेख, शान कक्कर, रंजीत दास, अभिलाषा घैरा, प्रतिभा शिंपी, आरती शिंदे; तर आर्ट – राजू माळी, मेकअप- केतन, कॉस्ट्यूम- संगीता चौरे आणि आरती पाटील कुलकर्णी, लाईन प्रोड्यूसर- शाहजहां शेख, प्रोडक्शन मैनेजर- अमजदखान शेख, किरण घोडके, अभिषेक चौरे, हर्ष राजे, मेकअप – किरण सिद्दीद्दी यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदी आणि मराठीतले अनेक कलाकार या चित्रपटाचा भाग आहेत.

]]>
561