लाईफस्टाईल – Batamipatra24 https://batamipatra24.com निस्वार्थ बातम्या देणारे संकेतस्थळ Thu, 04 Apr 2024 08:15:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://batamipatra24.com/wp-content/uploads/2023/10/maha.png लाईफस्टाईल – Batamipatra24 https://batamipatra24.com 32 32 मधुमेह होण्यापूर्वी तुमच्या शरीरात ‘ही’ लक्षणे दिसू लागतात, तज्ञांकडून जाणून घ्या प्रतिबंधात्मक पद्धती https://batamipatra24.com/before-you-develop-diabetes-your-body-starts-showing-these-symptoms-learn-from-experts-about-prevention-methods/ Thu, 02 Nov 2023 03:35:29 +0000 https://batamipatra24.com/?p=494 मधुमेह आजार हा आता सामान्य आजारासारखा झाला आहे. आज घरोघरी मधुमेहाचे रुग्ण आढळतात. परंतु हा आजार एकदा झाला की लवकर बारा करण्याची औषधे मात्र नाहीत. मधुमेह का होतो ? मधुमेह होण्याची अनेक करणे आहेत. पण आजच्या काळात मधुमेहाचे मुख्य कारण म्हणजे शारीरिक हालचालींचा अभाव. याशिवाय घरी बनवलेले पदार्थ कमी खाणे, मद्यपान करणे आणि जंक फूडचे जास्त सेवन करणे हे याची आणखी काही करणे आहेत. मधुमेह होऊ नये असे वाटत असेल तर आधी आपली जीवनशैली आपल्याला बदलावी लागेल. चांगला आहार घ्यावा लागेल, व्यायाम आणि योगाला सुरवात करावी लागेल व नित्यनेमाने तो करावा लागेल. परंतु मधुमेह कसा टाळावा आणि तो होण्याआधी सुरुवातीची लक्षणे काय आहेत? हे जाणून घेऊया.

जर तुमचे वजन जास्त असेल आणि तुमच्या कुटुंबातील कोणाला मधुमेह असेल तर तुम्ही सावध गिरी बाळगणे गरजेचे आहे, कारण जास्त वजन आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी तुम्हाला या आजाराकडे घेऊन जातात. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करा, चांगला आहार घ्या, जास्त पाणी प्या आणि सकाळ-संध्याकाळ फिरायला जात जा असे तज्ज्ञ सांगतात.

कोणती आहेत प्री-डायबेटिसची लक्षणे?
प्री-डायबेटीसची लक्षणे खूप सामान्य असतात, रुग्णामध्ये अशी काही लक्षण खूप उशीरा आढळून दिसतात. पण हे कळेपर्यंत त्यांना खूप उशीर झालेला असतो आणि त्यांना टाइप 2 डायबेटिस होऊन जातो. प्री-डायबेटिसची लक्षणांमध्ये भूक वाढणे किंवा कमी होणे, थकवा जाणवणे आणि जास्त तहान लागणे ही लक्षणे समाविष्ट आहे.

मधुमेहाचा पुरुष हार्मोन्सवर पडतो प्रभाव
मधुमेह झाल्यास संप्रेरकांच्या पातळीवर परिणाम होतो. मग ते स्त्री असो वा पुरुष हा परिणाम जाणवतो. जेव्हा पुरुषांना मधुमेह होतो, तेव्हा त्यांच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते, तर महिलांमध्ये संप्रेरकांची पातळी देखील कमी असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मधुमेही रुग्णांनी कोणती फळे खाल्ली पाहिजेत?
मधुमेही सर्व फळे खाऊ शकतात, पण मधुमेहींनी फायबरयुक्त फळे जास्त खावीत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. संत्री आणि किवीप्रमाणेच हंगामी फळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात.

या गोष्टी टाळा
मधुमेहाच्या रुग्णांनी मद्यपान करू नये, तळलेले अन्न, तांदूळ व बटाटे जास्त प्रमाणात खाऊ नयेत, तसेच आंबा, अननस, चिकू अशी गोड फळे आहेत ते जास्त प्रमाणात खाणे टाळले पाहिजे.

]]>
494
Nokia 105 Classic : Nokia ने 999 रुपयांचा फोन केला लॉन्च ! UPI पेमेंटचेही ऑप्शन, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स https://batamipatra24.com/nokia-105-classic-nokia-launched-a-phone-of-999-rupees-also-know-the-option-of-upi-payment-amazing-features/ Sat, 28 Oct 2023 04:47:00 +0000 https://batamipatra24.com/?p=486 Nokia 105 Classic : एक काळ होता कि जेव्हा फक्त नोकिया कंपनीच्याच फोनचे राज्य होते. एकदम टिकाऊ अन परवडेबल फोन म्हणजे नोकिया होता. आता नोकिया चे ते जुने दिवस पुन्हा एकदा आपण अनुभवू शकतो. कारण आता नोकिया ने नवीन फिचर फोन लॉन्च केला आहे.

HMD Global ने या वर्षाच्या सुरुवातीला Nokia 105 4G फोन लाँच केला होता. आता कंपनीने Nokia 105 क्लासिक नावाचे आणखी एक मॉडेल लाँच केले आहे. हा सर्वात स्वस्त फीचर फोन आहे जो बिल्ट-इन यूपीआय सिस्टमसह येतो, जो 2 जी कनेक्टिव्हिटी प्रदान करतो. जाणून घेऊयात Nokia 105 Classic चे किंमत आणि फीचर्स…

Nokia 105 Classic चे फीचर्स
Nokia 105 Classic मध्ये इनबिल्ट यूपीआय अॅप्लिकेशन आहे. याद्वारे तुम्ही सुरक्षित आणि सोयीस्कर व्यवहार प्रक्रिया करू शकता. याशिवाय युजर्संना एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटीही दिली जाते. डिव्हाइस वायरलेस रेडिओ क्षमतेसह येते जे आपल्याला हेडसेटशिवाय एफएम रेडिओ ऐकण्याची सुविधा प्रदान करते. फोनमध्ये 800mAh बॅटरी आहे. यूजरला विविध सुविधा देण्याच्या विचाराने नोकिया 105 क्लासिकमध्ये कॉम्पॅक्ट डिझाइन आहे, ज्यामुळे हँडसेट सांभाळणे किंवा एका ठिकाणावरून दुसरीकडे नेणे सोपे होते. शिवाय पर्यावरणविषयक जागरुकता लक्षात घेऊन त्याच्या टिकाऊ व मजबूतपणाची देखील काळजी घेण्यात आली आहे.

Nokia 105 Classic Price In India
Nokia 105 Classic हा भारतात अधिकृतरित्या उपलब्ध आहे. फोन चार्जरसह किंवा त्याशिवाय चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये येतो. तसेच त्यात सिंगल सिम आणि ड्युअल सिम दोन्ही पर्याय आहेत. याची किंमत 999 रुपयांपासून सुरू होते. हा फोन चारकोल आणि ब्लू या दोन आकर्षक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

]]>
486