अहमदनगर – Batamipatra24 https://batamipatra24.com निस्वार्थ बातम्या देणारे संकेतस्थळ Wed, 13 Nov 2024 14:59:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://batamipatra24.com/wp-content/uploads/2023/10/maha.png अहमदनगर – Batamipatra24 https://batamipatra24.com 32 32 नगर तालुक्यात नागवडे आणि पाचपुते यांच्यामध्येच रस्सीखेच, कौल कुणाला ? https://batamipatra24.com/nagar-taluka-between-nagwade-and-pachpute-kaul-who/ Wed, 13 Nov 2024 14:59:12 +0000 https://batamipatra24.com/?p=611 बातमीपत्र24/ टीम : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत होत असून मतदारसंघातील उमेदवाराचे भवितव्य व निर्णायक मतदान नगर तालुक्यातील मतदारांवरच अवलंबून आहे. नगर तालुक्यात भाजपा युतीचे उमेदवार विक्रमसिंह पाचपुते व महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांच्यामध्ये मोठी रस्सीखेच पाहावयास मिळत आहे.

श्रीगोंदा मतदार संघात नगर तालुक्यातील वाळकी, चिचोंडी पाटील गट जोडला असल्याने येथील मतदारांचा कौल हा श्रीगोंद्याचे आमदार ठरविण्यात नेहमीच निर्णायक ठरत आला आहे. तालुक्यात भाजपा व उबाठा शिवसेना यांची मोठी ताकद व कार्यकर्ते आहेत. त्यामुळे येथे पाचपुते व नागवडे यांच्यामध्ये मोठी रस्सीखेच चालू असल्याचे पहावयास मिळत आहे.

तालुक्यातील मतदार पाचपुतेंना कौल देणार की नागवडेंना याबाबत विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. गावोगावी महाविकास आघाडी तसेच महायुतीचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झाले असून दोन्हीकडूनही आपल्या उमेदवाराला मताधिक्य देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

नागवडे तसेच पाचपुते समर्थकांकडून विजयाचा दावा करण्यात येत असला तरी तालुक्यातील मतदार कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून तालुक्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून नागवडे अन् पाचपुते यांच्यामध्ये मोठी चुरस पहावयास मिळत आहे.

श्रीगोंदा मतदारसंघाला जोडल्या गेलेल्या दोन्ही गटांमध्ये भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचे प्राबल्य आहे. त्यांचे कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांना मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. गावोगावी नागवडे तसेच पाचपुते यांच्या गाव भेटी,

प्रचार दौरे, चौक सभा पार पडत असून दोन्ही समर्थकांकडून विजयाचा दावा करण्यात येत आहे. एकंदरीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचे भवितव्य हे नगर तालुक्यातील मतदारांवरच अवलंबून असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील मतदारांनी दिलेला कौल हा निवडणुकीत निर्णायक ठरत असतो.

]]>
611
मेहेकरी विद्यालयास कै. विलासराव आठरे पाटील ट्रस्ट तर्फे आदर्श विद्यालय पुरस्कार https://batamipatra24.com/mehekari-vidyalaya-ka-adarsh-vidyalaya-award-by-vilasrao-athare-patil-trust/ Wed, 16 Oct 2024 08:37:05 +0000 https://batamipatra24.com/?p=594 स्व. प्राचार्य विलासरावजी आठरे व स्व. जनाताई आठरे यांचे स्मरणार्थ आदर्श विद्यालय पुरस्कार दरवर्षी दिला जातो. हा पुरस्कार जिल्हा मराठा संस्थेतील सर्व शाखांमधून प्रथम क्रमांकास दिला जातो. यंदाच्या वर्षी अ.नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री सद्गुरु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मेहेकरी या विद्यालयाला हा पुरस्कार संस्थेच्या दसरा मेळाव्यात देण्यात आला.

ट्रॉफी व तीस हजार रुपये असे या बक्षिसाचे स्वरूप आहे. तसेच शासनाचा स्वच्छ व सुंदरशाळा पुरस्कारही विद्यालयाला मिळालेला आहे. या विद्यालयाने संस्था, लोकसहभाग, लोकप्रतिनिधी, खाजगी कंपन्या, क्रीडा कार्यालय यामधून पैसा उभा करून लाखो रुपयांची कामे पूर्ण केलेली आहेत.

तसेच या आधीच अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेने एक कोटीची इमारत बांधून दिलेली आहे. विद्यालयामध्ये तालीम, बाग,विविध खेळाचे मैदाने , कारंजे, इंडोअर गेम हॉल, सभागृह,प्रत्येक वर्ग डिजिटल, सिमेंट रस्ता, पेविंग ब्लॉक अशी अनेक कामे पूर्ण झाले असल्याची व केलेल्या कामाबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शाळेचे कौतुक केले असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य गोबरे व्ही.एच यांनी दिली.

]]>
594
मेहेकरी विद्यालय आदर्श, स्वच्छ व सुंदर विद्यालय : आ.बबनराव पाचपुते https://batamipatra24.com/mehekari-vidyalaya-ideal-clean-and-beautiful-school-a-babanrao-pachpute/ Sun, 13 Oct 2024 15:41:55 +0000 https://batamipatra24.com/?p=586 अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री सद्गुरु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मेहेकरी ही जिल्ह्यातील एक आदर्श स्वच्छ व सुंदर शाळा आहे.

शासनाचा  स्वच्छ व सुंदरशाळा पुरस्कारही विद्यालयाला मिळालेला आहे. या विद्यालयाने लोकसहभाग, लोकप्रतिनिधी, खाजगी कंपन्या यामधून निधी उभा करत लाखो रुपयांची कामे पूर्ण केली, हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांनी काढले.

आ. बबनराव पाचपुते यांनी विद्यालयाला सिमेंटचा रस्ता व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पेविंग ब्लॉक साठी निधी दिला. ते काम पूर्ण झाल्यानंतर पाचपुते  यांनी शाळेत येऊन पाहणी केली.  यावेळी ते बोलत होते.

ते पुढे बोलताना म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची व बहुजन समाजाची मुले येथे शिक्षण घेत असल्याचा मला आनंद होत आहे असेही ते म्हणाले.

प्राचार्य विकास गोबरे यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेने एक कोटीची इमारत बांधून दिलेली आहे. आज विद्यालयामध्ये तालीम,बाग,विविध खेळाचे मैदाने , कारंजे, इंडोअर गेम हॉल, सभागृह,  डिजिटल वर्ग अशी अनेक कामे पूर्ण झालेली आहेत.

यावेळी मेहेकरी गावचे सरपंच नंदूशेठ पालवे, महेश लांडगे,  करपे तात्या आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चौधरी आर बी  यांनी केले. आभार पर्यवेक्षक श्री. श्रीकांत कातोरे यांनी मानले.

]]>
586
मेहेकरी विद्यालयाचा 100 टक्के निकाल https://batamipatra24.com/mehekari-vidyalaya-result-100-percent/ Thu, 30 May 2024 05:23:45 +0000 https://batamipatra24.com/?p=566 अहमदनगर : श्री सद्गुरू माध्य. व उच्च माध्य. विद्यालय मेहेकरी विद्यालयाने 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली. इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागला. इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा निकालही 100 टक्के लागला असून कला शाखेचा निकाल 97 टक्के लागला.

यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे – बारावी विज्ञान शाखेत प्रथम-सूर्यवंशी प्रांजल 80.50%, द्वितीय- दळवी अस्मिता 77.83%, तृतीय- शिंदे ऋतुजा 77.17% तर बारावी कला शाखेत प्रथम – शिंदे मोनिका 82.17%, द्वितीय – वाकचौरे श्रावणी 79.50%, तृतीय – वाकचौरे अर्चना 78.67% तसेच इयत्ता दहावी मध्ये प्रथम – कुमटकर साक्षी 92.80%, द्वितीय-पंडित सायली 88.80%, तृतीय – शिंदे राधिका 88.20%

यशस्वी विद्यार्थ्यांचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रा.ह.दरे, उपाध्यक्ष डॉ.विवेक भापकर, सचिव ऍड.विश्वासराव आठरे, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार ऍड.दीप लक्ष्मी म्हसे ज्येष्ठ विश्वस्त जे.डी खानदेशे, विश्वस्थ नंदकुमार झावरे, विश्वस्त मुकेश मुळे व इतर विश्वस्त, सदस्य, शाळा समितीचे सदस्य शिवाजीराव पालवे, दक्षता समितीचे अध्यक्ष संतोष करपे, सरपंच नंदू पालवे, विद्यालयाचे प्राचार्य गोबरे व्ही एच, ज्युनिअर कॉलेजचे समन्वयक चौधरी आर.बी. ग्रामस्थ व सर्व सेवक वृंद आदींनी अभिनंदन केले.

]]>
566
जामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे लोरी चित्रपटास संगीत दिग्दर्शन https://batamipatra24.com/jamkhed-writer-director-altaf-shaikh-composed-the-music-for-the-film-lori/ Mon, 06 May 2024 08:47:54 +0000 https://batamipatra24.com/?p=561 जामखेड / तालुका प्रतिनिधी : चित्रपट दिग्दर्शक अल्ताफ शेख हे लेखन, दिग्दर्शन, गीतकार या पाठोपाठ आता बॉलिवूड चित्रपटात संगीत दिग्दर्शक रूपाने प्रेक्षकांसमोर येत आहेत. अल्ताफ शेख यांनी आगामी हिंदी चित्रपट ‘लोरी’चे गीत लेखन केले असून, सुधीर कुमार हजेरी यांच्यासोबत संगीत दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. प्रसिध्द गायक सुरेश वाडकर, गायिका उर्मिला धनगर, गायक स्वप्निल बांदोडकर, गायिका प्रियांका बर्वे आणि गायिका अंजली गायकवाड यांनी या चित्रपटाची गाणी गायली आहेत.

दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘वेडा बी.एफ.’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला. ११ करोड ५० लाख ४५ हजार सातशे रुपये एवढा गल्ला करून रेकॉर्ड ब्रेक करून टाकले. सिनेमातील ‘हे माझे दुर्वेश बाबा’ या गाण्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन ‘लोरी’ या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली. ती त्यांनी सुधीर कुमार हजेरी यांच्यासोबत यशस्वीपणे पार पाडली आहे.

अल्ताफ शेख यांनी त्यांच्या अनोख्या लेखन शैलीतून याआधी चार चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यापैकी २०१८ मध्ये रिलीज झालेल्या वेडा बी.एफ या हिंदू – मुस्लीम ऐक्यावर भाष्य करणार्‍या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला केला होता. वेडा बी.एफ चित्रपटाची नोंद वल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेले आहेत.

दरम्यान, साई राम अ क्रिएटिव्ह वर्ल्डचप्र स्तुती असलेल्या लोरी चित्रपटाचे निर्मिती अविनाश कवठणकर यांची असून, दिग्दर्शन राजू रेवणकर यांचे आहे. डीओपी कुमार डोंगरे, पणती पटेल, राजकुमार, अली शेख, शान कक्कर, रंजीत दास, अभिलाषा घैरा, प्रतिभा शिंपी, आरती शिंदे; तर आर्ट – राजू माळी, मेकअप- केतन, कॉस्ट्यूम- संगीता चौरे आणि आरती पाटील कुलकर्णी, लाईन प्रोड्यूसर- शाहजहां शेख, प्रोडक्शन मैनेजर- अमजदखान शेख, किरण घोडके, अभिषेक चौरे, हर्ष राजे, मेकअप – किरण सिद्दीद्दी यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदी आणि मराठीतले अनेक कलाकार या चित्रपटाचा भाग आहेत.

]]>
561
सामाजिक कार्यकर्ते अविनाश साठे(सर) युवा मंचकडून किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण https://batamipatra24.com/prize-distribution-of-social-avinash-sathe-sar-manch-yuva-kille-banava/ Mon, 01 Jan 2024 08:27:57 +0000 https://batamipatra24.com/prize-distribution-of-social-avinash-sathe-sar-manch-yuva-kille-banava/ निलेश लंके प्रतिष्ठान महा .राज्य. व अविनाश साठे सर मित्र परिवार आयोजित किल्ले बनवा स्पर्धा-२०२३ या स्पर्धेचे हे दुसरे पर्व आहे . या स्पर्धेतून मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचे कौशल्य वृंधिगत व्हावे, आपल्या सणासुदींचे महत्व, भारतीय संस्कृतीची महती मिळावी , आपल्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्याविषयीचे अफाट ज्ञान व महाराजांचा इतिहास यातून मुलांना मिळावा म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. आयोजक श्री. अविनाश साठे सर हे सामाजिक,शैक्षणिक, व क्रीडा क्षेत्रात नेहमी अग्रेसर असतात . या सामाजिक कार्यातून त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार ,महाराष्ट्र भूषण पुरस्कार, स्वराज्यभूषण पुरस्कार, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.या स्पर्धचा बक्षीस वितरण कार्यक्रम नगर-पारनेर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री.निलेशजी लंके साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी आमदार साहेबांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना सायकल व शैक्षणिक वस्तुंचे वाटप करण्यात आले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक- चि.शिवराज रावसाहेब देवकर,द्वितीय क्रमांक- कु. रागिनी गोरख उमाप, तृतीय क्रमांक- ध्रुव मुठे व रुद्र मुठे यांना सामूहिक, चतुर्थ क्रमांक – सोहंम सुखदेव मुठे, पाचवा क्रमांक- स्वराजराजे जमदाडे, सहावा क्रमांक – कु. अभिलाशा साठे, सातवा क्रमांक- प्रताप खंडागळे यांनी पटकावला कार्यक्रम प्रसंगी आमदार निलेशजी लंके साहेब यांनी आयोजक श्री. अविनाश साठे सर यांच्या कार्याचे कौतुक केले .व विजेत्या स्पर्धकांना पुढील वर्षी यापेक्षाही अधिक छान गडकिल्ले बनवण्याविषयीं मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी भोयरे पठार व भोयरे खुर्द गावचे सरपंच,उपसरपंचं, ग्रा.प. सदस्य, वि.का.से.सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन , सदस्य,त्याचप्रमाणे आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष , पदाधिकारी, पालक व मित्र परिवार मोठ्या संख्यने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नानासाहेब डोंगरे यांनी केले. व आभार श्री.अमोल बोठे यांनी मानले.

]]>
529
जाबं कौडगाव येथील शाळेची वर्ग खोली मंजूर : शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश https://batamipatra24.com/classroom-room-of-the-school-in-jab-kaudgaon-approved-shiv-senas-pursuit-is-a-success/ Thu, 16 Nov 2023 10:06:43 +0000 https://batamipatra24.com/classroom-room-of-the-school-in-jab-kaudgaon-approved-shiv-senas-pursuit-is-a-success/ तालुक्यातील जांब कौडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची वर्गखोली गेल्या तीन महिन्यांपूर्वी पावसामुळे कोसळली होती. शिवसेनेच्या पाठपुरावानंतर आता जिल्हा परिषदे कडून नवीन वर्ग खोली मंजूर झाली असून त्यासाठी बारा लाखांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती युवासेना जिल्हा उपप्रमुख सोमनाथ कांडके यांनी दिली.

जांब येथील जिल्हा परिषद शाळा 27 जुलैला भिज पावसाने कोसळली होती.सुदैवाने ही घटना रात्री घडल्याने कोणतीही जीवित हानी घडली नाही. मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गखोली उपलब्ध नसल्याने शाळा मंदिरात तर कधी ग्रामस्थांच्या घरात भरावी लागत होती.

विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड व घटनेचे गांभीर्य ओळखून शिवसेनेचे जि.प.सदस्य संदेश कार्ले, पं.स.सभापती संदीप गुंड, युवासेना जिल्हा उपप्रमुख सोमनाथ कांडके यांच्यावतीने जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात साहेब, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी(प्राथमिक) भास्कर पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शाळा खोलीला तात्काळ मंजुरी दिली.

त्यामुळे आता लवकरच शाळा खोली बांधण्यात येईल. विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रश्न सुटणार असल्याने जांब येथील मुख्याध्यापिका, ग्रामस्थ व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

]]>
513
सामाजिक कार्यकर्ते अविनाश साठे सरांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार प्रदान https://batamipatra24.com/bharat-ratna-sardar-vallabhbhai-patel-rashtra-ratna-award-conferred-on-social-activist-avinash-sathe-sir/ Mon, 13 Nov 2023 14:05:49 +0000 https://batamipatra24.com/bharat-ratna-sardar-vallabhbhai-patel-rashtra-ratna-award-conferred-on-social-activist-avinash-sathe-sir/ डॉ. मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट व निती आयोग भारत सरकार दिल्ली संलग्नित यांच्या वतिने. यंदाचा मानाचा समजला जाणारा ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार – 2023 “हा. पुरस्कार भोयरे पठार गावचे सुपूत्र मा. श्री. अविनाश बाबासाहेब साठे यांना मिळाला.

त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील व शैक्षणिक शकेत्रातील उत्तुंग कामगिरी बद्दल डॉ. रविंद्र भोळे यांच्या हस्ते लोकशाहिर आण्णाभाऊ साठे रंगमंच भवन पुणे. या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

या वेळी डॉ.रविंद्र भोळे आपल्या भाषणात बोलताना श्री. अविनाश साठे सर यांच्या सामाजिक कार्यबद्दल तोंड भरून कौतूक केले व म्हणाले आजच्या आधुनिक युगात हा तरुण निस्वार्थ भावनेने आपले सामाजिक कार्य करत आहे. यापुढेही त्यांनी आपले काम असेच चालू ठेवावे असे उद्गार काढले.

पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. अविनाश साठे सरांचे सर्वत्र कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

]]>
511
अहमदनगर : शिंदे गटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुतेंसह 40 जणांविरूध्द गुन्हा, नगरसेवकांचाही समावेश https://batamipatra24.com/ahmednagar-crime-against-40-people-including-city-chief-dilip-satput-of-shinde-group-corporators-also-included/ Thu, 02 Nov 2023 03:41:24 +0000 https://batamipatra24.com/?p=498 शिवसेनेचे नगरसेवक ज्ञानेश्वर येवले, संग्राम कोतकर, शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह 40 जणांविरूध्द गुन्हा दखल करण्यात आला आहे. रस्त्याच्या कामासाठी नगर-पुणे महामार्गावर केडगाव बस स्टॉप येथे त्यांनी आंदोलने केले होते. याच प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय घडले होते ?
नगर-पुणे महामार्गावरील अंबिकानगर बसस्थानकासमोर नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, संग्राम कोतकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी मंगळवारी निदर्शने केली. प्रभाग क्रमांक 16 मधील रस्त्याचे काम सुरू करावे अशी त्यांची मागणी होती. नगर-पुणे महामार्ग रोखून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणाकोणावर गुन्हा दाखल ?
नगरसेवक ज्ञानेश्वर शिवाजी येवले, शिंदे गटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, संग्राम संजय कोतकर, नगरसेवक विजय पठारे, डॉ. श्रीकांत चेमटे, हर्षवर्धन कोतकर, प्रतिक बारसे, विठ्ठल कोतकर, संदेश शिंदे, पप्पू भाले आदींसह 40 लोकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

]]>
498