विजय गोबरे – Batamipatra 24 https://batamipatra24.com Wed, 26 Mar 2025 08:35:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 माजी झेडपी सदस्य संदेश कार्ले अन पंचायत समिती सभापती रामदास भोर यांचा मोठा निर्णय ! शिवसेनेला रामराम करत नव्या पक्षात प्रवेश https://batamipatra24.com/former-zp-member-sandesh-karle-and-panchayat-samiti-chairman-ramdas-bhors-big-decision-joining-a-new-party-leaving-shiv-sena/ https://batamipatra24.com/former-zp-member-sandesh-karle-and-panchayat-samiti-chairman-ramdas-bhors-big-decision-joining-a-new-party-leaving-shiv-sena/#respond Wed, 26 Mar 2025 08:35:21 +0000 https://batamipatra24.com/?p=293 विजय गोबरे : आज अहिल्यानगरमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी होणार आहेत. आज खऱ्या अर्थाने नगरमध्ये ठाकरेंची सेना ही पोरकी होणार आशा चर्चा सध्या सुरू आहेत. नगर तालुक्यात खऱ्या अर्थाने शिवसेना ज्यांनी वाढवली, रुजवली अन याच पक्षमार्फत जिल्हा परिषदेत दोनदा तर पंचायत समितीला एकदा विजय मिळवला असे सेनेचे खंदे मावळे संदेश कार्ले हे आज शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

त्यांच्यासोबत रामदास भोर हे देखील शिंदेंसेनेत जातायत. आगामी निवडणुका तसेच सत्तास्थान आदी गोष्टी पाहता अन विकासकामे आदी गोष्टी सोयीला लागव्यात याकरता शिंदे गटात हे जातायत अस म्हटलं जातंय.
खरतर विधानसभेला पारनेर आणि नगर या दोन्ही ठिकाणी ठाकरेंच्या सेनेला तिकीट दिल गेलं नाही, तेथेच कार्ले नाराज झाले होते. विधानसभेला ही नाराजगी दिसूनही आली. त्यानंतर ते शिंदे गटाची चाचपणी करत होते.

आज ते खऱ्या अर्थाने शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होतील. आता यानंतर या सर्वांचे म्होरके , नेते, मार्गदर्शक गाडे सर काय भूमिका समोर मांडतायेत तेही पाहणे गरजेचे आहे. पण या प्रवेशाने नगर तालुक्यातील खा.लंके, आ.कर्डीले, ना. विखे यांच्याही राजकारणावर परिणाम होणार हे नक्की. मित्रांनो खरतर या पक्षप्रवेशाला अनेक राजकीय किनार आहेत.. त्याचाही उलगडा लवकरच आम्ही करणार आहोत.

]]>
https://batamipatra24.com/former-zp-member-sandesh-karle-and-panchayat-samiti-chairman-ramdas-bhors-big-decision-joining-a-new-party-leaving-shiv-sena/feed/ 0
गुणवंत विद्यार्थी हीच शिक्षकाची खरी ओळख : दरे https://batamipatra24.com/standard-student-is-teacher-identy-dare/ https://batamipatra24.com/standard-student-is-teacher-identy-dare/#respond Thu, 30 Jan 2025 17:07:33 +0000 https://batamipatra24.com/?p=289 अहिल्यानगर : गुणवंत विद्यार्थी हीच शिक्षकांची खरी ओळख असते, त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून गुणवंत आणि संस्कारशील विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी केले.

मेहेकरी (तालुका नगर) येथील सदगुरु विद्यालयाचे प्राचार्य विकास गोबरे यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम बुधवारी (दि.२९) पार पाडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दरे होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त जी. डी. खानदेशी, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार अॅड. दीपलक्ष्मी म्हसे, संस्थेच्या सदस्या निर्मला काटे, ज्येष्ठनेते भगवानराव बेरड, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेशराव सुंबे, माजी सभापती मिर्झा मणियार, माजी प्राचार्य ए. आर. दोडके, प्राचार्य पोकळे, सरपंच नंदू पालवे, माजी सरपंच म्हातारदेव पालवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी पालवे, स्कुल कमिटीचे सदस्य शिवाजी पालवे, दक्षता समितीचे अध्यक्ष संतोष करपे, युवा उद्योजक प्रवीण कदम, विठ्ठलराव बेरड, समन्वयक रमेश चौधरी, सभापती संदीप गुंड, माजी सरपंच योगेश लांडगे, दक्षता कमिटीचे उपाध्यक्ष सुधीर वायकर, सत्यजित पालवे, शशी पालवे, सचिन पंडित, राजीव काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सेवानिवृत्तीबद्दल प्राचार्य विकास गोबरे व सुजाता गोबरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्ष निवड तसेच कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य श्रीकांत कातोरे यांनी केले.

सद्गुरू विद्यालयामध्ये संस्थेच्या माध्यमातून व लोकसहभागातून प्रा. गोबरे यांनी या विद्यालयाची एक वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षकाने नेहमी विद्यार्थी व संस्थेशी प्रामाणिक राहावे विद्यालय हेच कुटुंब समजून गोबरे यांनी या विद्यालयांमध्ये अनेक उपक्रम राबवले आणि म्हणूनच या विद्यालयाला तीन लाख रुपये व स्मृतिचिन्ह देऊन राज्य शासनाचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे नगर तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली.

आई, वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीतून मला शिक्षण दिलं. त्यांच्या कष्टामुळेच मला व माझ्या मुलांना चांगले संस्कार मिळाले. आई, वडील खूप थकलेले आहेत त्यांची सेवा करण्यासाठी मी वेळेआधीच सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. संस्था आणि विद्यार्थी सर्वांशी प्रामाणिक राहिलो असल्याचे सांगताना यावेळी प्राचार्य गोबरे खूपच भावनिक झाले होते.

]]>
https://batamipatra24.com/standard-student-is-teacher-identy-dare/feed/ 0
मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांना ‘डॉक्‍टर ऑफ सायन्‍स’ पदवी https://batamipatra24.com/doctor-of-science-degree-to-minister-radhakrishna-vikhe/ https://batamipatra24.com/doctor-of-science-degree-to-minister-radhakrishna-vikhe/#respond Fri, 03 Jan 2025 12:52:41 +0000 https://batamipatra24.com/?p=284 Batamipatra24 Team :  जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने ‘डॉक्‍टर ऑफ सायन्‍स’ ही मानाची पदवी देवून सन्‍मानित करण्‍याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्‍या २६ व्‍या पदवीदान समारंभामध्‍ये ही पदवी प्रदान केली जाणार आहे.

मंत्री विखे पाटील यांनी शेती, सहकार, शिक्षण या क्षेत्रात केलेल्‍या उल्‍लेखनिय कार्याची दखल घेवून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने त्‍यांना ‘डॉक्‍टर ऑफ सायन्‍स’ या पदवीने सन्‍मानित करण्‍याचा निर्णय घेतला. यापूर्वी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाने मंत्री विखे पाटील यांना जीवन गौरव पुरस्‍काराने आणि राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाने डॉक्‍टर ऑफ सायन्‍स पदवी देवून सन्‍मानित केले होते.

मंत्री विखे पाटील यांनी आपल्‍या राजकीय, सामाजिक वाटचालीत अनेक महत्‍वपूर्ण पदांवर काम करुन, सामाजिक हिताचे निर्णय घेतले. या मध्‍ये प्राध्‍यान्‍याने कृषी व पणन मंत्री असताना शेतकरी हिताच्‍या निर्णयांमुळे कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळाली. शेतकरी ते ग्राहक ही योजना पहिल्‍यांदा राज्‍यात सुरु करुन शेतक-यांच्‍या उत्‍पादीत मालाला नवी बाजारपेठ मिळवून देण्‍याचा यशस्‍वी प्रयत्‍न केला. शेतकरी गट आणि फार्मर्स प्रोड्युसर कंपन्‍यांना त्‍यांनी मंत्रीपदाच्‍या माध्‍यमातून प्रोत्‍साहन दिले होते.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा सहकार चळवळीचा वारसा त्‍यांनी पुढे घेवून जातानाच सहकारी साखर कारखानदारी, सहकारी बॅकींग क्षेत्र आणि सहकारी पतसंस्‍था चळवळीलाही त्‍यांनी पाठबळ देत सहकार क्षेत्रामध्‍ये मोठे योगदान दिले आहे. लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या माध्‍यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना शैक्षणिक सुविधा उपलब्‍ध करुन देतानाच कौशल्‍य शिक्षणालाही त्‍यांनी मोठे प्राधान्‍य दिले आहे.

मंत्री विखे पाटील यांच्‍या सामाजिक कार्याचा गौरव म्‍ह‍णून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने डॉक्‍टर ऑफ सायन्‍स ही पदवी देवून सन्‍मान केल्‍याबद्दल त्‍यांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे.

”वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने केंद्रीय रस्‍ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्‍यासह मलाही ‘डॉक्‍टर ऑफ सायन्‍स’ ही पदवी देवून सन्‍मानित करण्‍याचा निर्णय घेतल्‍याबद्दल मी विद्यापीठाच्‍या सर्व पदाधिका-यांचा आभारी आहे. राजकीय, सामाजिक जीवनात मिळालेल्‍या संधीमधून समाजासाठी काम करत आहे. लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळसाहेब विखे पाटील यांच्‍या विचारांचा वारसा घेवून शेती, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात अधिकचे काम करण्‍यासाठी हा मिळालेला सन्‍मान माझ्यासाठी एक उर्जा असल्‍याची प्रतिेक्रीया मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

]]>
https://batamipatra24.com/doctor-of-science-degree-to-minister-radhakrishna-vikhe/feed/ 0
व्यापारी, लघुउद्योजकांची पिळवणूक करू नका : किरण काळे https://batamipatra24.com/dont-exploit-traders-small-entrepreneurs-kiran-kale/ https://batamipatra24.com/dont-exploit-traders-small-entrepreneurs-kiran-kale/#respond Fri, 03 Jan 2025 07:29:48 +0000 https://batamipatra24.com/?p=260 Batamipatra24 Team : महावितरणद्वारे संपूर्ण महाराष्ट्रासह अहिल्यानगर शहरात स्मार्ट विद्युत मीटर सक्तीचे केले गेले आहे. जनतेचे आर्थिक शोषण करण्याचे काम महाराष्ट्र सरकार व महावितरण यांच्या माध्यमातून देशातील काही भांडवलदारी कंपन्या करत आहेत. अहिल्यानगर शहरात विद्युत स्मार्ट मीटर बसविण्यास काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असल्याचे लेखी निवेदन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे नेतृत्वाखाली महावितरणचे अध्यक्ष अभियंता यांना देण्यात आले.

सदर मीटर बसवून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, लघुउद्योजकांची पीळवणूक करू नका, असा इशारा यावेळी बोलताना काळे यांनी दिला आहे.

यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, माथाडी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, उपाध्यक्ष जाहिदा शेख, दिव्यांग शहर काँग्रेस विभाग जिल्हाध्यक्ष मिनाज सय्यद, क्रीडा व युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश अल्हाट, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, शहर काँग्रेस सामाजिक न्याय युवा आघाडीचे अध्यक्ष गौरव घोरपडे आदींसह पदाधिकारी उपस्थिती होती.

काळे याबाबत बोलताना म्हणाले की, भारत सरकारकडून ऑगस्ट २०२१ मध्ये याबाबतचा कायदा भांडवलदारी कंपन्यांना फायदा व्हावा या हेतूने पारित केल्याचे निदर्शनास येत असून जनतेवर वाढीव बोजा टाचण्याचे षडयंत्र तेव्हा पासून नियोजित होते असे दिसते. २० किलो वॅट किंवा २७ हॉर्स पावर पेक्षा कमी विद्युत दाब असणारे विद्युत उपभोक्ता म्हणजेच सर्वसामान्य कुटुंब, गोरगरीब नागरिक, शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, लघुउद्योजक यांच्यावर जाणीवपूर्वक अन्यायकारक असे धोरण ठरवून घेतलेला हा निर्णय आहे.

मार्च २०२५ पर्यंत विद्युत स्मार्ट मीटर लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून यातून फक्त जनतेचे नुकसान होईल असे स्पष्टपणे दिसते आहे. केंद्र सरकारची भूमिका ही जनहित विरोधी व भांडवलदार स्नेही आहे.

काळे पुढे म्हणाले, संपूर्ण भारतात २२ कोटी २३ लाख विद्युत मीटर बदलायचे सरकारचे उद्दिष्ट असून त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांचे मोठे आर्थिक शोषण होणार आहे. त्यास काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे. यापैकी महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्रातील सुमारे २ कोटी २५ लाख ६५ हजार विद्युत मीटर बदलण्याचा डा व आहे. यासाठी राज्य सरकारने रु. ३९ हजार ६०२ कोटी एवढा खर्च करण्याचे ठरविले आहे. आज पर्यंत महाराष्ट्र राज्यात किमान सुमारे १ लाख ७५ हजार स्मार्ट मीटर कार्यरत आहेत.

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर कोणत्या भौगोलिक क्षेत्रात कोणत्या कंपनीकडून विकायचे याचे टेंडर मंजूर केले असून यापूर्वी निवडणूकी आधी त्यांनी सभागृहात असे सांगितले होते की सदर मीटर हे आम्ही सामान्य ग्राहकांसाठी बसविणार नाही. मात्र प्रत्यक्षात तसे न करता आता सदर मीटर हे सामान्य ग्राहकांसाठी देखील बसवण्याचे काम सुरू करण्यात आले. सरकारने दिलेला शब्द न पाळता नागरिकांची फसवणूक सुरू केली असल्याचा आरोप काळे यांनी यावेळी केला.

काळे म्हणाले, राज्यामध्ये विविध विभाग करण्यात आले असून या विभागांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची कंत्राटे अदानी ग्रुप, एनसीसी कंपनी, मेसर्स जीनस कंपनी अशा भांडवलदारी कंपन्यांना सुमारे रू. २६,९३९ कोटींचे टेंडर राज्य सरकारच्या वतीने देण्यात आल्याची माहिती आहे. सदर कंपन्या या स्मार्ट विद्युत मीटरची निर्मिती करणाऱ्या कंपन्या नसून देखील त्यांना सदर कंत्राटे देण्यात आली आहेत. ती कोणत्या आधारावर देण्यात आली, हा संशोधनाचा विषय आहे. यामध्ये मोठ्या आर्थिक हितसंबंध, देवाघेवाण व घोटाळा झाला असल्याचा आमचा आरोप आहे.

पैसे कुठून आणणार ? 
एकूण २,२४,६१,३४६ मीटर करिता तब्बल रू. २६,९३९ कोटी या कंत्राटी कंपन्यांना दिले जाणार आहेत. यात ६०% रक्कम भारत सरकारच्या वतीने तर ४०% रक्कम ही महावितरण महाराष्ट्र यांच्याकडून दिली जाणार आहे. अगोदरच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेली महावितरण ही महाराष्ट्राची सरकारी कंपनी हे पैसे कुठून आणणार ? कर्ज काढून आणणार काय की वीज उपभोक्त्यांवर आर्थिक बोजा टाकून वसूल करणार ? असा संतप्त सवाल करत किरण काळे म्हणाले की, शेवटी यासाठीचे पैसे हे सर्वसामान्य जनतेच्या खिशातून जाणार हे स्पष्ट आहे.

सदर विद्युत स्मार्ट मीटरची निर्मिती व जोडणी किंमत रु. ६३०० प्रति मीटर अपेक्षित असताना या मीटरच्या किमतीत जवळपास दुप्पट वाढ करून रु. १२००० हे कंत्राट सदर कंपन्यांना देण्यात आले आहे. हा सरळ सरळ घोटाळा असून यामागे प्रस्थापित राज्यकर्त्यांचे मोठे आर्थिक हितसंबंध दडल्याचा आरोप यावेळी काळेंनी केला.

बेरोजगारीचे संकट :
डीआयएससीओएम महावितरणच्या वितरण विभागाचे हे खाजगीकरणाकडे जाणारे धोरण असून विद्युत स्मार्ट मीटर सोबत अकाउंट आणि बिलिंग विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. यामुळे हजारो कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न बेरोजगारी होत निर्माण होणार असल्याचे यावेळी किरण काळे म्हणाले.

विद्युत स्मार्ट मीटरच्या नावावर विद्युत चोरी थांबणार असा खोटा बनाव राज्य सरकार करीत आहे. वास्तविक पाहता २० केवी पेक्षा जास्त विद्युत दबाव वापर करणाऱ्या ग्राहकांकडून विज चोरी झाल्याचे बहुदा निदर्शनास आले असल्याचे काळे म्हणाले.

स्मार्ट मिटरचे तोटे :
१. ग्राहकाला सध्या वीज बिल भरण्यासाठी मुभा मिळते. परंतु स्मार्ट मिटर मुळे ग्राहकाला पहिले रु. २००० किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्जे पाहिले करावे लागेल. नंतर लाईट वापरावी लागेल.
२. स्मार्ट मिटरचा बॅलन्स संपल्यावर घरातील लाईट आपोआप बंद होईल. त्यामुळे रात्री अपरात्री रिचार्जे संपल्यास अंधारात बसण्याची वेळ येईल.
३. सर्वसामान्य गरीब जनतेचे आर्थिक नियोजन कोलमडेल. पहिलेच महागाईने वैतागलेलं जनतेला महावितरण मोठा झटका देत आहे.

अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा :
मोठ्या प्रमाणावर राजकीय सत्ताधारी पक्षांना रसद पुरवणारे अडाणी व इतर तीन कंपन्या जनतेची आर्थिक लूट करून त्यातील रक्कम तीन महिने बिनव्याजी स्वरूपात वापरणार आणि एकीकडे ग्राहकांना प्रीपेड स्वरूपात विद्युत बिलाचे पैसे भरण्यास बंधनकारक करून महाराष्ट्राच्या जनतेचे आर्थिक शोषण करू पाहणाऱ्या या बोगस विद्युत स्मार्ट मीटर योजनेचा आम्ही अहिल्यानगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करत त्याचा विरोध करीत आहोत.

सद्यस्थितीत सदर मीटर बसण्याचे काम सुरू केले गेले असून सुरुवातीचे काम पूर्ण झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी सदर कामास तात्काळ स्थगिती देऊन ते बंद करण्यात यावे. अन्यथा आम्ही जनहितार्थ याबाबत आक्रमक आंदोलनात्मक भूमिका घेऊ, असा इशारा यावेळी किरण काळे यांनी काँग्रेसच्या वतीने महावितरणला दिला आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांना देखील देण्यात आली आहे.

]]>
https://batamipatra24.com/dont-exploit-traders-small-entrepreneurs-kiran-kale/feed/ 0
भाजपची आणखी एक खेळी, Sujay Vikhe यांच पुनर्वसन होणार, लवकरच राज्यमंत्री पदाचा दर्जा https://batamipatra24.com/sujay-vikhe-rajyamantri/ https://batamipatra24.com/sujay-vikhe-rajyamantri/#respond Fri, 03 Jan 2025 07:50:52 +0000 https://batamipatra24.com/?p=268 https://batamipatra24.com/sujay-vikhe-rajyamantri/feed/ 0