Ahmednagar Politics : सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्रच राजकीय दिग्गजांची धावपळ सुरु आहे.
निवडणुका कोणत्याही असो यामध्ये आघाडीवर असणार नाव म्हणजे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.
मग ते नाव नेहमीच आघाडीवर असत. विरोधकांच्या टीकेच्या जहरी बाणांत असो वा स्वतःच्या पक्षाच्या विजयी वाटचालीत असो.
या सगळ्या गराड्यात सुसंस्कृत राजकारण कस करावं हे फक्त विखे परिवाराकडूनच शिकावं. विखे पाटलांवर पातळी सोडून टीका केली तरी विरोधक निश्चिन्त असतात ,कारण त्यांनाही हे माहीत असत की विखे पाटील हे सुसंस्कृत राजकारणी आहेत. ते आपण केलेली टीका खिलाडू वृत्तीने घेतील.
पण विखे पाटील यांनी केवळ कामेच करावीत का? ते देखील एक माणूस आहेत. त्यांनाही भावना आहेत.
त्यांचा साधेपणा, व्यक्त होण्याची पद्धत अन एका कडक चेहऱ्यामागे लपलेलं कोमल मन… हे सगळे विचार समोर येण्याचं कारण म्हणजे त्यांचे साधेपणाचे व्हायरल झालेले फोटो.
ते म्हणजे एका हॉटेलात येवून स्वतः विखे पाटलांनी नागरिकांसमवेत मिसळीवर ताव मारल्याचे फोटो.
नेमके काय झाले?
आपले कार्यकर्ते एका हॉटेलवर थांबलेले आहेत हे समजताच नविन नगर मार्गावरील एका हॉटेलात येवून स्वतः विखे पाटलांनी मिसळीवर ताव मारला.
कार्यकर्त्यांशी संवाद साधला. निळवंडे येथे जलपूजन आणि पाणी सोडण्याच्या कार्यक्रमाला जाताना संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ते याच हॉटेल मध्ये एकत्रितपणे मिसळ खाण्यासाठी थांबले असल्याचे मंत्री विखे पाटील यांना समजले.
कार्यकर्त्यानी त्यांना मिसळ खाण्यासाठी येण्याचा आग्रह केला. मंत्री विखे पाटील आपला वाहनांचा संपूर्ण ताफा त्यांनी या हाॅटेलकडे वळवला आणि कार्यकर्त्या समवेत त्यांनी मिसळ खाण्याचा आनंद घेत त्यांनी तालुक्यातील राजकारणा बाबत काही टिप्सही दिल्या.
संगमनेरची प्रसिध्द असलेली जोशींची जिलेबी त्यांनी आवर्जून मागून घेतली. जोशीच्या जिलेबी स्व.बाळासाहेब विखे पाटील यांची आवड होती आशी आठवण करून दिली.
असा नेते होणे मुश्किल
ऐषोरामात कुठेही पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना जेवता आले असते पण कुठेतरी ते देखील माणूस आहेत.
आपलेच सहकारी मिसळीवर ताव मारतायत तर आपणही त्यातील एक आहोत हीच भावना जणू त्यांच्या मनात आली व त्यातून त्यांनी आपले पद, इतर तामझाम सगळ बाजूला ठेवून नागरिकांत धाव घेतली.
अगदी मनापासून ताव मारला. आपल्या वडिलांच्या आठवणीने ते भावुकही झाले. राजकारणात वावरताना स्वभाव कडक ठेवावा लागतो.
पण वेळेला अगदी आपल्या जनतेप्रमाणे साधही व्हावं लागत. जमिनीवरच राहून सर्वाना सोबत घ्यावं लागत हाच संदेश जणू त्यांनी दिला. पुरोगामी महाराष्ट्रात असा नेते होणे मुश्किल असेच काहीसे उदगार नागरिकांच्या चर्चेतून समोर येत होते.