मेहेकरी विद्यालयास कै. विलासराव आठरे पाटील ट्रस्ट तर्फे आदर्श विद्यालय पुरस्कार

स्व. प्राचार्य विलासरावजी आठरे व स्व. जनाताई आठरे यांचे स्मरणार्थ आदर्श विद्यालय पुरस्कार दरवर्षी दिला जातो. हा पुरस्कार जिल्हा मराठा संस्थेतील सर्व शाखांमधून प्रथम क्रमांकास दिला जातो. यंदाच्या वर्षी अ.नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री सद्गुरु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मेहेकरी या विद्यालयाला हा पुरस्कार संस्थेच्या दसरा मेळाव्यात देण्यात आला.

ट्रॉफी व तीस हजार रुपये असे या बक्षिसाचे स्वरूप आहे. तसेच शासनाचा स्वच्छ व सुंदरशाळा पुरस्कारही विद्यालयाला मिळालेला आहे. या विद्यालयाने संस्था, लोकसहभाग, लोकप्रतिनिधी, खाजगी कंपन्या, क्रीडा कार्यालय यामधून पैसा उभा करून लाखो रुपयांची कामे पूर्ण केलेली आहेत.

तसेच या आधीच अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेने एक कोटीची इमारत बांधून दिलेली आहे. विद्यालयामध्ये तालीम, बाग,विविध खेळाचे मैदाने , कारंजे, इंडोअर गेम हॉल, सभागृह,प्रत्येक वर्ग डिजिटल, सिमेंट रस्ता, पेविंग ब्लॉक अशी अनेक कामे पूर्ण झाले असल्याची व केलेल्या कामाबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शाळेचे कौतुक केले असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य गोबरे व्ही.एच यांनी दिली.