विजय गोबरे : आज अहिल्यानगरमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी होणार आहेत. आज खऱ्या अर्थाने नगरमध्ये ठाकरेंची सेना ही पोरकी होणार आशा चर्चा सध्या सुरू आहेत. नगर तालुक्यात खऱ्या अर्थाने शिवसेना ज्यांनी वाढवली, रुजवली अन याच पक्षमार्फत जिल्हा परिषदेत दोनदा तर पंचायत समितीला एकदा विजय मिळवला असे सेनेचे खंदे मावळे संदेश कार्ले हे आज शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.
त्यांच्यासोबत रामदास भोर हे देखील शिंदेंसेनेत जातायत. आगामी निवडणुका तसेच सत्तास्थान आदी गोष्टी पाहता अन विकासकामे आदी गोष्टी सोयीला लागव्यात याकरता शिंदे गटात हे जातायत अस म्हटलं जातंय.
खरतर विधानसभेला पारनेर आणि नगर या दोन्ही ठिकाणी ठाकरेंच्या सेनेला तिकीट दिल गेलं नाही, तेथेच कार्ले नाराज झाले होते. विधानसभेला ही नाराजगी दिसूनही आली. त्यानंतर ते शिंदे गटाची चाचपणी करत होते.
आज ते खऱ्या अर्थाने शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होतील. आता यानंतर या सर्वांचे म्होरके , नेते, मार्गदर्शक गाडे सर काय भूमिका समोर मांडतायेत तेही पाहणे गरजेचे आहे. पण या प्रवेशाने नगर तालुक्यातील खा.लंके, आ.कर्डीले, ना. विखे यांच्याही राजकारणावर परिणाम होणार हे नक्की. मित्रांनो खरतर या पक्षप्रवेशाला अनेक राजकीय किनार आहेत.. त्याचाही उलगडा लवकरच आम्ही करणार आहोत.